
धर्म निरपेक्ष भारत देशात धर्माच्या नावाखाली सुरू असलेली ” हलाल प्रमाणपत्र” व्यवस्था तात्काळ बंद करण्यात यावीत व अशी प्रमाण पत्रे देणार्या संस्थांची सी बी आय द्वारे चौकशी करण्यात यावीत म्हणून खानापूरचे तहसीलदार प्रवीण जैन यांच्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी हिंदू जनजागृती समितीचे कोनेरी कुमृतवाडकर यांनी सर्वांचे स्वागत केले व विषय सांगितला यानंतर या विषयाला अनुसरून भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कुबल, किरण येळुरकर सुभाष देशपांडे, यांची भाषणे झाली यानंतर भाजपाचे युवा नेते पंडित ओगले यांनी खानापूरचे तहसीलदार प्रवीण जैन यांना निवेदनात लिहिलेल्या मागण्या वाचून दाखविल्यानंतर निवेदन देण्यात आले यावेळी तहसीलदारांनी हे निवेदन ताबडतोब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पाठवतो असे सांगितले, यावेळी जनजागृती समितीचे संभाजी चव्हाण जीवाप्पा मयेकर, मल्लिकार्जुन मुतगी, जयप्रकाश बाळकट्टी,बी एम हमनावर डिके बडिगेर, वसंत देसाई, रमेश जैन, बाबू निरलगी, सदानंद मासेकर, गोविंदराव कीरमटे, हनमंत होनगेकर, गुंडू तोपिनकट्टी, प्रशांत खासनीस, विनायक चव्हाण, धनेश देसाई, विश्वास हुबळीकर, यल्लाप्पा घाडी, सतीश मिसाळ,आदि कार्यकर्ते व हिंदु नागरिक उपस्थित होते,



