
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा, युवा आघाडी मेळाव्याला जाहीर पाठिंबा.
खानापूर ; बेळगाव येथे युवा दिनी आयोजित युवा मेळाव्याला, खानापूर तालुका म. ए. समितीने पाठिंबा दर्शविला आहे. महात्मा फुले रोडवरील मराठा सांस्कृतिक भवन बेळगांव, येथे आयोजित युवा आघाडी मेळाव्याला, जाहीर पाठिंबा दर्शविला असून, तालुक्यातील सर्व युवावर्गाने आणि मराठी भाषिकांनी सदर मेळाव्याला वेळेत उपस्थित राहावेत, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री गोपाळराव देसाई, माजी आमदार श्री दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष श्री मुरलीधर पाटील व श्री निरंजन सरदेसाई, सरचिटणीस श्री आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
