सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या मार्गदर्शनानुसार खानापूर तालुक्याचा कायापालट करणार : आमदार विठ्ठलराव हलगेकर.
खानापूर : सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या मार्गदर्शनानुसार तसेच नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचना व समस्या लक्षात घेत खानापूर तालुक्याचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी केले.
खानापूर तालुका व शहरातील विविध प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी सोमवार, दि. 31 ऑगस्ट रोजी राजा शिवछत्रपती शिवस्मारक येथे आमदार हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
माजी आमदार दिगंबर पाटील यांनी मलप्रभा नदीचे पाणी तालुक्याबाहेर जात असल्याबाबत सर्वपक्षीय बैठक घेऊन खुलासा करण्याची मागणी केली होती. त्यांच्या सूचनेनुसार ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे आमदार हलगेकर यांनी सांगितले. कुसमळी येथील मलप्रभा नदीतून बेळगाव तालुक्यात पाणी नेण्याचा प्रकल्प त्यांच्या आमदारकीच्या काळात मंजूर झालेला नसून, यापूर्वीच्या आमदारांच्या कार्यकाळात तो मंजूर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक गावाला विकासकामांसाठी एक कोटीचा निधी….
व्हीबीव्हीजी रामजी योजना चांगली असून, या योजनेतून एका कुटुंबाला आठवड्यातील तीन दिवस काम उपलब्ध होते. ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक गावात ग्रामस्थांची बैठक घेऊन विकासकामांचे ठराव करावेत आणि ही कामे रामजी योजनेतून पूर्ण करावीत. प्रत्येक गावासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचे आमदारांनी सांगितले. या निधीतून ग्रामस्थांच्या ठरावानुसार शाळेच्या खोल्यांचे बांधकामदेखील ग्रामपंचायतीमार्फत करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विकासकामांचा लेखाजोखा मांडताना आमदार म्हणाले…
आपल्या कार्यकाळात मराठा मंडळ डिग्री कॉलेज ते करबळ खत्रीपर्यंत सुमारे 14 कोटी रुपयांचा काँक्रीट रस्ता करण्यात आला. खानापूरचे रुग्णालय 35 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले असून त्यामध्ये पूर्वीच्या आमदारांचा 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर होता. बाकी आम्ही मंजूर करून घेतले आहेत. तालुक्यातील 106 गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.
खानापूर शहरातील मारुतीनगर, वाजपेयी नगर, समर्थ नगर आणि मयेकर नगर परिसरातील रस्ते काँक्रीटचे करण्यात आले आहेत. जुन्या न्यायालयाच्या आवारातील तालुका पंचायतीच्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा आराखडा तयार आहे. केंद्र सरकारच्या योजनेतून आणखी 14 कोटी रुपयांचे व्यापारी संकुल उभारण्यासाठी पत्र प्राप्त झाले असून त्यासाठी 15 गुंठे जागेची आवश्यकता आहे. जागा उपलब्ध झाल्यास खानापूर शहरात दोन व्यापारी संकुले उभारली जातील, असे त्यांनी सांगितले.
जांबोटी क्रॉस ते पारिशवाड क्रॉस आणि तेथून रूमेवाडी क्रॉसपर्यंत द्विपदरी रस्ता करण्यासाठी 60 कोटी रुपयांची योजना तयार असल्याचेही आमदारांनी सांगितले. यामुळे खानापूर शहराभोवतीच्या रस्त्यांचा विकास होणार आहे. तसेच जंगल व इको-सेंसिटिव्ह भागातून जाणाऱ्या सुमारे 806 किलोमीटर रस्त्यांच्या विकासाचीही योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाणी, रस्ते आणि वीज समस्यांवर लक्ष देण्याची मागणी…
बैठकीच्या सुरुवातीला भाजपचे प्रधान कार्यदर्शी व तालुका पंचायतीचे माजी उपसभापती मल्लाप्पा मारीहाळ यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर उपस्थित विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तालुक्यातील समस्यांचा पाढा मांडला.
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश देशपांडे यांनी तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने पाणी व वीज समस्या सोडविण्याची गरज व्यक्त केली. कळसा-भांडूरा प्रकल्पाचा लाभ खानापूर तालुक्याला मिळावा, कुसमळी व पारिशवाड प्रकल्पातील पाण्यामुळे तालुक्याचे नुकसान होऊ नये, मलप्रभा नदीचे खोलीकरण करून पाणीसाठा वाढवावा, खानापूर-हेमाडगा रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर विकास करावा, नगरपंचायतीच्या जॅकवेलजवळील पुलाचे नवीन बांधकाम करावे, अशी मागणी त्यांनी केली.
मासळी मार्केटजवळील रस्त्याचा प्रश्न शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन सोडवावा आणि गणपती उत्सवापूर्वी रस्ता खुला करावा, खानापूर शहरातील 24 तास पाणीपुरवठा योजनेला गती द्यावी, 106 गावांच्या पाणीपुरवठा योजनेत खानापूर शहराचा समावेश करावा तसेच शहराबाहेरील रिंग रोडची दुरुस्ती करावी, अशा विविध मागण्या त्यांनी मांडल्या.
मराठी शिक्षक भरतीसह रुग्णालयातील सुविधांची मागणी…
महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी राजू पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केल्याबद्दल आमदारांचे कौतुक केले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. खानापूर सरकारी रुग्णालयात सोनोग्राफी तज्ज्ञाची नियुक्ती करावी, मराठी शिक्षकांची भरती करावी आणि तालुक्याच्या विकासासाठी आमदारांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली. विधानसभेत आमदारांनी मराठीत भाषण केल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अर्जुन देसाई यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध निधी अपुरा असल्याचे सांगून रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. हलशीवाडी-हलशी रस्ता तसेच बेकवाड-हलशी रस्त्याची दुरुस्ती करून निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. सरकारी कार्यालयांत नागरिकांना कागदपत्रे मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
नारायण काटगाळकर यांनी खानापूर-हेमाडगा रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता संजय गस्ती यांनी रस्ता दुरुस्त करण्याची ग्वाही दिली.
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर उपस्थितांकडून नाराजी…
चापगाव ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष रमेश धबाले यांनी पीडीओ, तलाठी तसेच शिक्षकांच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले. खताची चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी नागरिकांनी कोणतीही अडचण असल्यास थेट आपल्याशी संपर्क साधावा, आपण 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले.
काँग्रेसचे माजी युवा नेते व अंजुमन इस्लामचे अध्यक्ष इरफान तालिकोट यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या, हेस्कॉममधील कर्मचाऱ्यांची कमतरता, पोलीस स्थानकात तक्रार दाखल करताना नागरिकांना होणारा त्रास, तहसीलदार कार्यालयातील विलंब तसेच जंगली प्राण्यांकडून पिकांचे होणारे नुकसान या समस्या मांडल्या.
रणजीत पाटील यांनी सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून नागरिकांच्या कामांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा मुद्दा उपस्थित केला. पीडीओंना ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातच वास्तव्य करण्याची सक्ती करावी, कृषी विभागाच्या बंधाऱ्यांच्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
वीज व बससेवेबाबतही प्रश्न
माजी जिल्हा परिषद सदस्य जयराम देसाई यांनी जलजीवन मिशनच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला. हेस्कॉमकडून वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी त्यांनी केली. ग्रामीण भागातील बससेवा विस्कळीत होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
जयंत तीनेकर यांनी कुसमळी व पारिशवाड प्रकल्पातील पाणी बाहेरील तालुक्यात नेण्याच्या प्रश्नावर न्यायालयीन लढा देण्याची गरज व्यक्त केली. या कायदेशीर लढ्यासाठी मदत म्हणून 10 हजार रुपये देणगी देण्याची घोषणा केली.
दलित संघटनेचे चंद्रशेखर यांनी हक्की-पक्की समाजातील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मांडून कायमस्वरूपी निवासासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
माजी जिल्हा परिषद सदस्य विलासराव बेळगावकर यांनी सरकारी कार्यालयांमध्ये एजंटराज असल्याचा आरोप करत नागरिकांची कामे विनाकारण प्रलंबित ठेवली जात असल्याचे सांगितले. तालुक्यात विविध ठिकाणी बंधारे उभारून त्याचा सर्वसामान्यांना व शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असे नियोजन करण्याची मागणी त्यांनी केली.
23 समस्यांचे लेखी निवेदन….
यशवंत बिरजे यांनी आमदार हलगेकर यांना तालुक्यातील 23 समस्यांचे लेखी निवेदन साद केले. या समस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. कमी पावसामुळे गणपती विसर्जनासाठी मलप्रभा नदी घाटाजवळ फळ्या टाकून पाणी अडवावे, तहसीलदार कार्यालयातील सर्व्हेअरच्या समस्येमुळे नागरिकांना कागदपत्रांसाठी होणारी धावपळ थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
भाजपचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव देसाई यांनी वाळूचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगितले. वाळू व्यवसायावर अनेक नागरिक व कामगार अवलंबून असल्याने वाळू व्यवसाय सुरू करण्यासाठी आमदारांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली. कस्तुरीरंगन अहवालात खानापूर तालुक्यातील 60 गावांचा समावेश असल्याने त्याविरोधात सर्वपक्षीयांनी एकत्रितपणे आवाज उठवावा, असेही त्यांनी सांगितले.
माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी तालुक्यात विविध ठिकाणी चार-पाच बंधारे बांधून प्रथम खानापूर तालुक्याची पाण्याची गरज भागवावी आणि उर्वरित पाणी इतरत्र सोडावे, अशी सूचना केली.
तालुका पंचायतीचे माजी सदस्य व अर्बन बँकेचे संचालक बाळासाहेब शेलार यांनी कन्नडबरोबरच मराठी शिक्षकांचीही भरती करावी तसेच जुन्या न्यायालयाच्या आवारात व्यापारी संकुल उभारावे, अशी मागणी केली.
बैठकीस महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, पीएलडी बँकेचे चेअरमन व समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, प्रकाश चव्हाण, शिवसेनेचे के पी पाटील, सदानंद पाटील, लक्ष्मण बामणे, संजय कुबल, प्रमोद कोचेरी, प्रशांत लक्केबेलकर, भरमाणी पाटील यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ಸರ್ವಪಕ್ಷೀಯ ನಾಯಕರುಗಳ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಂತೆ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕನ್ನು ಸಮಗ್ರವಾಗಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಲಾಗುವುದು : ಶಾಸಕ ವಿಠ್ಠಲರಾವ್ ಹಲಗೇಕರ ಭರವಸೆ.
ಖಾನಾಪುರ : ಸರ್ವಪಕ್ಷೀಯ ನಾಯಕರುಗಳ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಂತೆ ಹಾಗೂ ನಾಗರಿಕರನ್ನು ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು, ಅವರ ಸಲಹೆ-ಸೂಚನೆಗಳು ಮತ್ತು ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಸಮಗ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹಾಗೂ ಪರಿವರ್ತನೆಗಾಗಿ ತಾವು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಪ್ರಯತ್ನಿಸುವುದಾಗಿ ಶಾಸಕ ವಿಠ್ಠಲರಾವ್ ಹಲಗೇಕರ್ ಹೇಳಿದರು.
ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಾ ಹಾಗೂ ನಗರದಲ್ಲಿನ ವಿವಿಧ ಬಾಕಿ ಉಳಿದಿರುವ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳು, ಮೂಲಸೌಕರ್ಯಗಳು ಮತ್ತು ನಾಗರಿಕರ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಕುರಿತು ಚರ್ಚಿಸಿ ಅವುಗಳಿಗೆ ಪರಿಹಾರ ಕಂಡುಕೊಳ್ಳುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಸೋಮವಾರ, ದಿ. 31 ಆಗಸ್ಟ್ ರಂದು ರಾಜಾ ಶಿವಛತ್ರಪತಿ ಶಿವಸ್ಮಾರಕದಲ್ಲಿ ಶಾಸಕ ಹಲಗೇಕರ್ ಅವರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಸರ್ವಪಕ್ಷೀಯ ಸಭೆ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಭೆಯನ್ನುದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡುತ್ತಾ ಅವರು ಈ ರೀತಿ ಹೇಳಿದರು.
ಮಾಜಿ ಶಾಸಕ ದಿಗಂಬರ ಪಾಟೀಲ ಅವರು ಮಲಪ್ರಭಾ ನದಿಯ ನೀರು ತಾಲೂಕಿನಿಂದ ಹೊರಗೆ ಹರಿದು ಹೋಗುತ್ತಿರುವ ಕುರಿತು ಸರ್ವಪಕ್ಷೀಯ ಸಭೆ ನಡೆಸಿ ಸ್ಪಷ್ಟನೆ ನೀಡಬೇಕೆಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದರು. ಅವರ ಸಲಹೆಯಂತೆ ಈ ಸಭೆಯನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಶಾಸಕ ಹಲಗೇಕರ್ ಹೇಳಿದರು. ಕುಸಮಳಿ ಗ್ರಾಮದ ಮಲಪ್ರಭಾ ನದಿಯಿಂದ ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕಿಗೆ ನೀರು ಕೊಂಡೊಯ್ಯುವ ಯೋಜನೆ ತಮ್ಮ ಶಾಸಕತ್ವದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಮಂಜೂರಾಗಿಲ್ಲ. ಈ ಯೋಜನೆ ಹಿಂದಿನ ಶಾಸಕರ ಅವಧಿಯಲ್ಲಿಯೇ ಮಂಜೂರಾಗಿರುವುದಾಗಿ ಅವರು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದರು.
ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗಾಗಿ ಒಂದು ಕೋಟಿ ರೂ. ಅನುದಾನ….
ವಿಬಿವಿಜಿ ರಾಮಜಿ ಯೋಜನೆ ಉತ್ತಮವಾಗಿದ್ದು, ಈ ಯೋಜನೆಯಡಿ ಒಂದು ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ವಾರದಲ್ಲಿ ಮೂರು ದಿನ ಕೆಲಸ ದೊರೆಯುತ್ತದೆ. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿಯೂ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಸಭೆ ನಡೆಸಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳ ಕುರಿತು ನಿರ್ಣಯಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಹಾಗೂ ಆ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ರಾಮಜಿ ಯೋಜನೆಯಡಿ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಬೇಕು. ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಒಂದು ಕೋಟಿ ರೂ. ಅನುದಾನ ಲಭ್ಯವಿದೆ ಎಂದು ಶಾಸಕ ಹಲಗೇಕರ್ ತಿಳಿಸಿದರು.
ಈ ಅನುದಾನದಿಂದ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ನಿರ್ಣಯದಂತೆ ಶಾಲಾ ಕೊಠಡಿಗಳ ನಿರ್ಮಾಣವನ್ನೂ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಮೂಲಕ ಕೈಗೊಳ್ಳಬಹುದಾಗಿದೆ ಎಂದು ಅವರು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದರು.
ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ನೀಡಿದ ಶಾಸಕ ಹಲಗೇಕರ್…
ತಮ್ಮ ಅಧಿಕಾರಾವಧಿಯಲ್ಲಿ ಮರಾಠಾ ಮಂಡಳ ಡಿಗ್ರಿ ಕಾಲೇಜಿನಿಂದ ಕರಂಬಳ ಖತ್ರಿವರೆಗೆ ಸುಮಾರು 14 ಕೋಟಿ ರೂ. ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಕಾಂಕ್ರೀಟ್ ರಸ್ತೆ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಖಾನಾಪುರದ ಆಸ್ಪತ್ರೆಯನ್ನು 35 ಕೋಟಿ ರೂ. ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದ್ದು, ಇದಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದಿನ ಶಾಸಕರ ಅವಧಿಯಲ್ಲಿ 15 ಕೋಟಿ ರೂ. ಅನುದಾನ ಮಂಜೂರಾಗಿತ್ತು.
ತಾಲೂಕಿನ 106 ಗ್ರಾಮಗಳಿಗೆ ಕುಡಿಯುವ ನೀರು ಪೂರೈಕೆ ಯೋಜನೆ ಮಂಜೂರಾಗಿದೆ. ಖಾನಾಪುರ ನಗರದ ಮಾರುತಿನಗರ, ವಾಜಪೇಯಿ ನಗರ, ಸಮರ್ಥ ನಗರ ಹಾಗೂ ಮಯೇಕರ್ ನಗರ ಪ್ರದೇಶಗಳ ರಸ್ತೆಯನ್ನು ಕಾಂಕ್ರೀಟ್ ರಸ್ತೆಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ.
ಹಳೆಯ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿರುವ ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯಿತಿಯ ಜಾಗದಲ್ಲಿ ವಾಣಿಜ್ಯ ಸಂಕೀರ್ಣ ನಿರ್ಮಿಸಲು ಯೋಜನೆಯ ನೀಲನಕ್ಷೆ ಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಯೋಜನೆಯಡಿ ಇನ್ನೂ 14 ಕೋಟಿ ರೂ. ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ವಾಣಿಜ್ಯ ಸಂಕೀರ್ಣ ನಿರ್ಮಿಸಲು ಪತ್ರ ಬಂದಿದ್ದು, ಇದಕ್ಕಾಗಿ 15 ಗುಂಟೆ ಜಾಗದ ಅವಶ್ಯಕತೆಯಿದೆ. ಜಾಗ ಲಭ್ಯವಾದರೆ ಖಾನಾಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಎರಡು ವಾಣಿಜ್ಯ ಸಂಕೀರ್ಣಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಅವರು ಹೇಳಿದರು.
ಜಾಂಬೋಟಿ ಕ್ರಾಸ್ನಿಂದ ಪಾರಿಶವಾಡ ಕ್ರಾಸ್ ಹಾಗೂ ಅಲ್ಲಿಂದ ರೂಮೇವಾಡಿ ಕ್ರಾಸ್ವರೆಗೆ ದ್ವಿಪಥ ರಸ್ತೆ ನಿರ್ಮಿಸಲು 60 ಕೋಟಿ ರೂ.ಗಳ ಯೋಜನೆ ಸಿದ್ಧವಾಗಿದೆ ಎಂದು ಶಾಸಕ ಹಲಗೇಕರ್ ತಿಳಿಸಿದರು. ಇದರಿಂದ ಖಾನಾಪುರ ನಗರದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ರಸ್ತೆಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಾಗಲಿದೆ.
ಅದೇ ರೀತಿ ಅರಣ್ಯ ಹಾಗೂ ಪರಿಸರ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪ್ರದೇಶಗಳ ಮೂಲಕ ಸಾಗುವ ಸುಮಾರು 806 ಕಿಲೋಮೀಟರ್ ರಸ್ತೆಗಳನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸುವ ಯೋಜನೆಯೂ ಇದೆ ಎಂದು ಅವರು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದರು.
ನೀರು, ರಸ್ತೆ ಹಾಗೂ ವಿದ್ಯುತ್ ಸಮಸ್ಯೆಗಳತ್ತ ಗಮನಹರಿಸಲು ಆಗ್ರಹ…
ಸಭೆಯ ಆರಂಭದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಹಾಗೂ ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯಿತಿಯ ಮಾಜಿ ಉಪಸಭಾಪತಿ ಮಲ್ಲಪ್ಪ ಮಾರಿಹಾಳ ಅವರು ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕವಾಗಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಬಳಿಕ ವಿವಿಧ ಪಕ್ಷಗಳ ಮುಖಂಡರು, ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ತಾಲೂಕಿನ ವಿವಿಧ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಸಭೆಯ ಮುಂದಿಟ್ಟರು.
ಹಿರಿಯ ಪತ್ರಕರ್ತ ಪ್ರಕಾಶ ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರು ತಾಲೂಕು ಭೌಗೋಳಿಕವಾಗಿ ದೊಡ್ಡದಾಗಿರುವುದರಿಂದ ನೀರು ಮತ್ತು ವಿದ್ಯುತ್ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಬಗೆಹರಿಸುವ ಅಗತ್ಯವಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು.
ಕಳಸಾ-ಭಾಂಡೂರಾ ಯೋಜನೆಯ ಪ್ರಯೋಜನ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿಗೂ ದೊರೆಯಬೇಕು. ಕುಸಮಳಿ ಹಾಗೂ ಪಾರಿಶವಾಡ ಯೋಜನೆಗಳಿಂದ ತಾಲೂಕಿನ ಜನತೆಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ನಷ್ಟವಾಗಬಾರದು. ಮಲಪ್ರಭಾ ನದಿಯನ್ನು ಆಳಗೊಳಿಸಿ ನೀರು ಸಂಗ್ರಹ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಬೇಕು. ಖಾನಾಪುರ-ಹೆಮ್ಮಾಡಗಾ ರಸ್ತೆಯನ್ನು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹೆದ್ದಾರಿ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಬೇಕು. ನಗರ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಜಾಕ್ವೆಲ್ ಬಳಿಯ ಸೇತುವೆಯನ್ನು ಹೊಸದಾಗಿ ನಿರ್ಮಿಸಬೇಕು ಎಂದು ಅವರು ಆಗ್ರಹಿಸಿದರು.
ಮೀನು ಮಾರುಕಟ್ಟೆ ಬಳಿಯ ರಸ್ತೆ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ರೈತರಿಗೆ ಪರಿಹಾರ ನೀಡಿ ಬಗೆಹರಿಸಬೇಕು ಹಾಗೂ ಗಣೇಶೋತ್ಸವಕ್ಕೂ ಮುನ್ನ ರಸ್ತೆ ಸಂಚಾರಕ್ಕೆ ಮುಕ್ತಗೊಳಿಸಬೇಕು. ಖಾನಾಪುರ ನಗರದ 24 ಗಂಟೆಗಳ ಕುಡಿಯುವ ನೀರು ಪೂರೈಕೆ ಯೋಜನೆಗೆ ವೇಗ ನೀಡಬೇಕು. 106 ಗ್ರಾಮಗಳ ಕುಡಿಯುವ ನೀರು ಪೂರೈಕೆ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಖಾನಾಪುರ ನಗರವನ್ನೂ ಸೇರಿಸಬೇಕು. ನಗರದ ಹೊರವಲಯದ ರಿಂಗ್ ರಸ್ತೆಯನ್ನು ದುರಸ್ತಿ ಮಾಡಬೇಕು ಎಂಬುದು ಸೇರಿದಂತೆ ವಿವಿಧ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಅವರು ಮಂಡಿಸಿದರು.
ಮರಾಠಿ ಶಿಕ್ಷಕರ ನೇಮಕಾತಿ ಸೇರಿದಂತೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸೌಲಭ್ಯಗಳಿಗಾಗಿ ಆಗ್ರಹ…
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿಯ ಪದಾಧಿಕಾರಿ ರಾಜು ಪಾಟೀಲ ಅವರು ಸರ್ವಪಕ್ಷೀಯ ಸಭೆ ಆಯೋಜಿಸಿರುವುದಕ್ಕಾಗಿ ಶಾಸಕ ಹಲಗೇಕರ್ ಅವರನ್ನು ಅಭಿನಂದಿಸಿದರು. ರಾಜಕೀಯವನ್ನು ಬದಿಗಿಟ್ಟು ತಾಲೂಕಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಒಗ್ಗೂಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಅಗತ್ಯವಿದೆ ಎಂದು ಅವರು ಹೇಳಿದರು.
ಖಾನಾಪುರ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸೋನೋಗ್ರಫಿ ತಜ್ಞರನ್ನು ನೇಮಕ ಮಾಡಬೇಕು. ಮರಾಠಿ ಶಿಕ್ಷಕರ ನೇಮಕಾತಿ ಮಾಡಬೇಕು ಹಾಗೂ ತಾಲೂಕಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಶಾಸಕರು ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು ಎಂದು ಅವರು ಆಗ್ರಹಿಸಿದರು. ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಶಾಸಕರು ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಭಾಷಣ ಮಾಡಿರುವುದು ಹೆಮ್ಮೆಯ ಸಂಗತಿಯಾಗಿದೆ ಎಂದು ಅವರು ಹೇಳಿದರು.
ಅರ್ಜುನ ದೇಸಾಯಿ ಅವರು ತಾಲೂಕಿನ ಸಮಗ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಲಭ್ಯವಿರುವ ಅನುದಾನ ಸಾಲುತ್ತಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಿ ರಸ್ತೆಗಳ ದುಸ್ಥಿತಿಯತ್ತ ಗಮನ ಸೆಳೆದರು. ಹಲಶಿವಾಡಿ-ಹಲಶಿ ರಸ್ತೆ ಹಾಗೂ ಬೇಕವಾಡ-ಹಲಶಿ ರಸ್ತೆಯನ್ನು ದುರಸ್ತಿ ಮಾಡಬೇಕು. ಕಳಪೆ ಕಾಮಗಾರಿ ನಡೆಸಿದ ಗುತ್ತಿಗೆದಾರರ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಎಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದರು.
ಸರ್ಕಾರಿ ಕಚೇರಿಗಳಲ್ಲಿ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಅಗತ್ಯ ದಾಖಲೆಗಳನ್ನು ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿಯೂ ಒದಗಿಸಬೇಕು ಎಂದು ಅವರು ಒತ್ತಾಯಿಸಿದರು.
ನಾರಾಯಣ ಕಾಟಗಾಳಕರ ಅವರು ಖಾನಾಪುರ-ಹೆಮ್ಮಾಡಗಾ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿನ ಗುಂಡಿಗಳನ್ನು ದುರಸ್ತಿ ಮಾಡಬೇಕು ಎಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಲೋಕೋಪಯೋಗಿ ಇಲಾಖೆಯ ಸಹಾಯಕ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ಎಂಜಿನಿಯರ್ ಸಂಜಯ ಗಸ್ತಿ ಅವರು ರಸ್ತೆ ದುರಸ್ತಿ ಮಾಡುವ ಭರವಸೆ ನೀಡಿದರು.
ಅಧಿಕಾರಿ-ಸಿಬ್ಬಂದಿಯ ಕಾರ್ಯವೈಖರಿ ಕುರಿತು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಅಸಮಾಧಾನ…
ಚಾಪಗಾವ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ರಮೇಶ ಧಬಾಲೆ ಅವರು ಪಿಡಿಒ, ತಲಾಟಿ ಹಾಗೂ ಶಿಕ್ಷಕರ ಕಾರ್ಯವೈಖರಿ ಕುರಿತು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಎತ್ತಿದರು. ರಸಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹೆಚ್ಚಿನ ದರದಲ್ಲಿ ಮಾರಾಟ ಮಾಡುವವರ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಎಂದು ಅವರು ಆಗ್ರಹಿಸಿದರು.
ತಹಶೀಲ್ದಾರ್ ದುಂಡಪ್ಪ ಕೋಮಾರ ಅವರು ನಾಗರಿಕರಿಗೆ ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದರೆ ನೇರವಾಗಿ ತಮ್ಮನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಬಹುದು. ತಾವು 24 ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ನಾಗರಿಕರ ಸೇವೆಗೆ ಲಭ್ಯವಿರುವುದಾಗಿ ತಿಳಿಸಿದರು.
ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಮಾಜಿ ಯುವ ನಾಯಕ ಹಾಗೂ ಅಂಜುಮನ್ ಇಸ್ಲಾಂ ಅಧ್ಯಕ್ಷ ಇರ್ಫಾನ್ ತಾಲಿಕೋಟಿ ಅವರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಹೆಸ್ಕಾಂನಲ್ಲಿ ಸಿಬ್ಬಂದಿ ಕೊರತೆ, ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ದೂರು ದಾಖಲಿಸುವಾಗ ನಾಗರಿಕರು ಎದುರಿಸುತ್ತಿರುವ ತೊಂದರೆ, ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಆಗುತ್ತಿರುವ ವಿಳಂಬ ಹಾಗೂ ಕಾಡುಪ್ರಾಣಿಗಳಿಂದ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಉಂಟಾಗುತ್ತಿರುವ ಹಾನಿ ಸೇರಿದಂತೆ ವಿವಿಧ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಸಭೆಯ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದರು.
ರಣಜಿತ್ ಪಾಟೀಲ ಅವರು ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಸಿಬ್ಬಂದಿ ನಾಗರಿಕರ ಕೆಲಸಗಳತ್ತ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ತೋರುತ್ತಿರುವ ವಿಷಯವನ್ನು ಪ್ರಸ್ತಾಪಿಸಿದರು. ಪಿಡಿಒಗಳು ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿಯೇ ವಾಸಿಸಬೇಕು. ಕೃಷಿ ಇಲಾಖೆಯ ಬಾಂಧಾರಗಳ ಕಾಮಗಾರಿಗಳ ತನಿಖೆ ನಡೆಸಬೇಕು ಎಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದರು.
ವಿದ್ಯುತ್ ಹಾಗೂ ಬಸ್ ಸೇವೆ ಕುರಿತೂ ಪ್ರಶ್ನೆಗಳು
ಮಾಜಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯ ಜಯರಾಮ ದೇಸಾಯಿ ಅವರು ಜಲಜೀವನ ಮಿಷನ್ ಕಾಮಗಾರಿಗಳ ಗುಣಮಟ್ಟದ ಕುರಿತು ಪ್ರಶ್ನೆ ಎತ್ತಿದರು. ಹೆಸ್ಕಾಂನಿಂದ ವಿದ್ಯುತ್ ಪೂರೈಕೆ ಸಮರ್ಪಕವಾಗಿ ಆಗುತ್ತಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ವಿದ್ಯುತ್ ಮಾರ್ಗಗಳನ್ನು ಭೂಗತಗೊಳಿಸಬೇಕು ಎಂದು ಅವರು ಆಗ್ರಹಿಸಿದರು.
ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶಗಳ ಬಸ್ ಸೇವೆ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತವಾಗುತ್ತಿರುವುದರಿಂದ ಶಾಲಾ-ಕಾಲೇಜು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ತೊಂದರೆ ಅನುಭವಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಅವರು ಹೇಳಿದರು.
ಜಯಂತ ತೀಣೆಕರ ಅವರು ಕುಸಮಳಿ ಹಾಗೂ ಪಾರಿಶವಾಡ ಯೋಜನೆಗಳ ನೀರನ್ನು ಹೊರ ತಾಲೂಕಿನತ್ತ ಕೊಂಡೊಯ್ಯುವ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನ್ಯಾಯಾಂಗ ಹೋರಾಟ ನಡೆಸುವ ಅಗತ್ಯವಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಈ ಕಾನೂನು ಹೋರಾಟಕ್ಕೆ ನೆರವಾಗುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ 10 ಸಾವಿರ ರೂ. ದೇಣಿಗೆ ನೀಡುವುದಾಗಿ ಘೋಷಿಸಿದರು.
ದಲಿತ ಸಂಘಟನೆಯ ಚಂದ್ರಶೇಖರ ಅವರು ಹಕ್ಕಿ-ಪಕ್ಕಿ ಸಮಾಜದ ನಾಗರಿಕರ ಪುನರ್ವಸತಿ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಸಭೆಯ ಮುಂದಿಟ್ಟು, ಶಾಶ್ವತ ವಸತಿಗಾಗಿ ಜಾಗ ಒದಗಿಸಬೇಕು ಎಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದರು.
ಮಾಜಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯ ವಿಲಾಸರಾವ್ ಬೆಳಗಾವಕರ ಅವರು ಸರ್ಕಾರಿ ಕಚೇರಿಗಳಲ್ಲಿ ಏಜೆಂಟ್ಗಳ ಹಾವಳಿ ಇದೆ ಎಂದು ಆರೋಪಿಸಿದರು. ನಾಗರಿಕರ ಕೆಲಸಗಳನ್ನು ವಿನಾಕಾರಣ ಬಾಕಿ ಉಳಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ ಎಂದು ಅವರು ಅಸಮಾಧಾನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ತಾಲೂಕಿನ ವಿವಿಧೆಡೆ ಬಾಂಧಾರಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿ, ಅದರ ಪ್ರಯೋಜನ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರು ಹಾಗೂ ರೈತರಿಗೆ ದೊರೆಯುವಂತೆ ಯೋಜನೆ ರೂಪಿಸಬೇಕು ಎಂದು ಅವರು ಒತ್ತಾಯಿಸಿದರು.
23 ಸಮಸ್ಯೆಗಳ ಲಿಖಿತ ಮನವಿ…
ಯಶವಂತ್ ಬಿರ್ಜೆ ಅವರು ಶಾಸಕ ಹಲಗೇಕರ್ ಅವರಿಗೆ ತಾಲೂಕಿನ 23 ಸಮಸ್ಯೆಗಳ ಲಿಖಿತ ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಈ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಪರಿಹಾರಕ್ಕಾಗಿ ಸರ್ವಪಕ್ಷೀಯ ನಾಯಕರು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಬೇಕು ಎಂದು ಅವರು ಆಗ್ರಹಿಸಿದರು.
ಕಡಿಮೆ ಮಳೆಯಾಗಿರುವ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಗಣೇಶ ವಿಸರ್ಜನೆಗಾಗಿ ಮಲಪ್ರಭಾ ನದಿ ಘಾಟ್ ಬಳಿ ಹಲಗೆಗಳನ್ನು ಹಾಕಿ ನೀರು ತಡೆದು ವಿಸರ್ಜನೆಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು. ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಕಚೇರಿಯ ಸರ್ವೇಯರ್ ಸಮಸ್ಯೆಯಿಂದ ನಾಗರಿಕರು ದಾಖಲೆಗಳಿಗಾಗಿ ಅಲೆದಾಡುವ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ಅಂತ್ಯ ಹಾಡಬೇಕು ಎಂದು ಅವರು ಆಗ್ರಹಿಸಿದರು.
ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡ ಹಾಗೂ ಮಾಜಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯ ಬಾಬುರಾವ್ ದೇಸಾಯಿ ಅವರು ಮರಳಿನ ಸಮಸ್ಯೆ ಗಂಭೀರವಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಮರಳು ಉದ್ಯಮದ ಮೇಲೆ ಅನೇಕ ನಾಗರಿಕರು ಹಾಗೂ ಕಾರ್ಮಿಕರು ಅವಲಂಬಿತರಾಗಿರುವುದರಿಂದ ಮರಳು ಉದ್ಯಮವನ್ನು ಪುನರಾರಂಭಿಸಲು ಶಾಸಕರು ಪ್ರಯತ್ನಿಸಬೇಕು ಎಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದರು.
ಕಸ್ತೂರಿರಂಗನ್ ವರದಿಯಲ್ಲಿ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ 60 ಗ್ರಾಮಗಳನ್ನು ಸೇರಿಸಲಾಗಿದ್ದು, ಇದಕ್ಕೆ ವಿರೋಧವಾಗಿ ಸರ್ವಪಕ್ಷೀಯರು ಒಗ್ಗಟ್ಟಿನಿಂದ ಧ್ವನಿ ಎತ್ತಬೇಕು ಎಂದು ಅವರು ಹೇಳಿದರು.
ಮಾಜಿ ಶಾಸಕ ದಿಗಂಬರರಾವ್ ಪಾಟೀಲ ಅವರು ತಾಲೂಕಿನ ವಿವಿಧೆಡೆ ನಾಲ್ಕೈದು ಬಾಂಧಾರಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿ, ಮೊದಲು ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ನೀರಿನ ಅಗತ್ಯವನ್ನು ಪೂರೈಸಬೇಕು. ಉಳಿದ ನೀರನ್ನು ಇತರ ಪ್ರದೇಶಗಳಿಗೆ ಹರಿಸಬೇಕು ಎಂದು ಸಲಹೆ ನೀಡಿದರು.
ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯಿತಿಯ ಮಾಜಿ ಸದಸ್ಯ ಹಾಗೂ ಅರ್ಬನ್ ಬ್ಯಾಂಕ್ ನಿರ್ದೇಶಕ ಬಾಳಾಸಾಹೇಬ ಶೇಲಾರ್ ಅವರು ಕನ್ನಡದ ಜೊತೆಗೆ ಮರಾಠಿ ಶಿಕ್ಷಕರನ್ನೂ ನೇಮಕ ಮಾಡಬೇಕು. ಹಳೆಯ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ವಾಣಿಜ್ಯ ಸಂಕೀರ್ಣ ನಿರ್ಮಿಸಬೇಕು ಎಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದರು.
ಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಗೋಪಾಳರಾವ್ ದೇಸಾಯಿ, ಪಿಎಲ್ಡಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹಾಗೂ ಸಮಿತಿಯ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಮುರಳೀಧರ ಪಾಟೀಲ, ನಿರಂಜನ ಸರದೇಶಾಯಿ, ಪ್ರಕಾಶ ಚವ್ಹಾಣ, ಲಕ್ಷ್ಮಣ ಬಾಮಣೆ, ಸಂಜಯ ಕುಬಲ, ಪ್ರಮೋದ ಕೋಚೇರಿ ಸೇರಿದಂತೆ ವಿವಿಧ ಪಕ್ಷಗಳ ಮುಖಂಡರು, ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹಾಗೂ ನಾಗರಿಕರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.



