खानापूर येथील मलप्रभा नदीच्या किनाऱ्यावर व मलप्रभा नदीला जोडणाऱ्या नाल्याच्या बाजूला वाळू माफिया सक्रिय झाले असुन त्यांनी उच्छाद मांडला आहे, वाळू फिल्टर करून श्री मलप्रभा नदीच्या पाण्यात सोडत असल्याने पाणी गढूळ झाले असून तेच गढूळ पाणी खानापूर शहरवासीयांना पणजी बेळगाव रस्त्यावरील नवीन पुलाकडे असलेल्या जॉकवेलद्वारे पिण्यासाठी व इतर घरगुती उपयोगासाठी सोडले जात आहे, त्या मुळे शहरवासीयांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असुन गुरांना ही दुषीत पाणी पाजवीण्यात येत आहे
इतके पाणी गढूळ होऊन ही खानापूर नगरपंचायतचे सर्व नगरसेवक गप्प का ??खानापुरातील नागरीकांना असाच गढूळ पाणीपुरवठा करणार काय यासाठीच तुम्हाला निवडून दिलो आहोत काय असा संतप्त सवाल नगरसेवकांना खानापूरकर जनता करत आहे, नागरिकांच्या आरोग्याचा हा प्रश्न असून नगरसेवकांनी तहसीलदार खानापूर व जिल्हाधिकारी बेळगाव यांच्याकडे यासंबंधी तक्रार करून मलप्रभा नदीत सोडण्यात येणारे गढूळ पाणी बंद करावेत अशी मागणी खानापुरातील संतप्त नागरिकांनी केली आहे,
तसेच हालात्री नदीसुद्धा खानापूर मलप्रभा नदीला जोडली गेली असल्याने हालात्री नदीच्या किनाऱ्यावर व हलात्री नदीला जोडणाऱ्या नाल्यावर सुद्धा वाळू माफिया वाळू काढून सदर घाण पाणी हालात्री नदीत सोडत असल्याने ते पाणी सुद्धा मलप्रभा नदीत मिसळत आहे श्री मलप्रभा नदी एक पवित्र नदी म्हणून ओळखली जाते आणि दूर दूर वरून भाविक अमावस्या पौर्णिमेला स्नान करण्यासाठी व देव कार्य करण्यासाठी पडल्या भरण्यासाठी आठवड्यातील सात हि दिवस पुजा व स्नान करण्यासाठी हजारो नागरिक येत असतात प्रत्येक भाविक मलप्रभा नदीतील गढूळ झालेले पाणी बघून डोक्याला हात मारून खानापूरकरांच्या व लोकप्रतिनिधींच्या नावाने लाखोल्या वाहून त्या गढूळ पाण्यातच स्नान करत आहेत, तेव्हा या गोष्टीकडे लोकप्रतिनिधी, खानापूर तहसीलदार व बेळगाव जिल्हाधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधीत गढूळ पाणी मलप्रभा नदीत सोडले जाणाऱ्यावर कारवाई करून सोडण्यात येणारे गढूळ पाणी बंद करून खानापूर शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करावात अशी मागणी सामान्य जनतेतून व नागरिकांतून होत आहे,