
बेळगावच्या किल्ला येथील श्री रामकृष्ण आश्रमामध्ये स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त , राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला .
गुरुवारी , बेळगावच्या किल्ला येथील श्री रामकृष्ण आश्रमामध्ये , आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन विद्यार्थी तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .या वेळी स्वामी आत्मप्राणानंदजी यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले . यावेळी , बेळगावच्या युवा सबलीकरण आणि क्रीडा विभागाचे उपसंचालक जिनेश्वर पडनाड यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले कि , केवळ भारताचा नाही तर संपूर्ण जगाला स्वामी विवेकानंद यांनी चैतन्याचा संदेश दिला . सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि चंद्रपणाने शीतल असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे . संपूर्ण जगाला हे स्फ्रूर्तीदायी व्यक्तिव आहे , सर्वानी त्यांचे आदर्श अंगी बाणवावेत असे सांगितले .
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमासाठी खास बेंगळूरहून आलेले डॉ . एच एन मुरलीधर यांनी आपल्या भाषणात सांगितले कि , मी कोण आहे , माझ्या येण्याचे प्रयोजन काय , याचे आत्मवलोकन करावे लागते . हे पाहण्याची दृष्टी स्वामी विवेकानंदानी संपूर्ण जगाला दिली . जागतिक शिखर परिषदेत त्यांनी हा संदेश दिला . मानवजातीच्या इतिहासाला सकारात्मक वळण दिले . विवेकानंदांचा हा संदेश अमलात आणण्याची गरज आहे असे ते म्हणाले .यावेळी स्वामी मोक्षात्मानंद तसेच अन्य मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते .
