
खानापूर शहरातील नागरिक आपल्या घरचा कचरा प्लास्टिक बॉटल प्लास्टिक पिशव्या गटर मध्ये टाकत असल्याने खानापूर शहरात जागोजागी गटर भरलेली असून त्यामुळे काही ठिकाणी गटर बंद पडून पाणी रस्त्यावरून वाहत आहे नगरपंचायतने याची दखल घेऊन जेसीबी च्या साह्याने गटारातील घाण काढून गटार मोकळी करत आहेत,

आज तहसीलदार कचेरी कंपाऊंडच्या कोपऱ्यावर गटर मुजले असता नगरपंचायतीचे कर्मचारी प्रेमानंद नाईक आपल्या नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी व जेसीबी घेऊन त्या ठिकाणी तात्काळ धावून आले व सदर गटर मोकळा केला

यावेळी नगरपंचायतीचे स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर हे सुद्धा उपस्थित होते त्यांनी नागरिकांना आव्हान केले आहे की आपल्या घरचा कचरा प्लास्टिक बॉटल प्लास्टिक पिशव्या सकाळी जी कचरा गाडी येते त्याच्यातच टाकावा जेणेकरून गटर मुजणार नाही फक्त नगरपंचायतीला दोष न देता नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली आहे,
