मराठा मंडळ ताराराणी हायस्कूल खानापूर, थ्रो बॉल जिल्हास्तरीय स्पर्धेत अव्वल स्थानी.
खानापूर ; कबड्डी, खो, खो ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारात खानापूर तालुक्यासह बेळगाव जिल्ह्यात मोठा नावलौकिक असलेल्या ताराराणी हायस्कूलच्या थ्रो बॉल खेळाडू विद्यार्थीनींनी आज बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठ हिंदवाडी यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत अंतिम सामन्यात आपली खेळातील सर्व कौशल्य पणाला लावून बेळगाव अर्बन टीममध्ये खेळणाऱ्या मातब्बर खेळाडूना नमवून डिव्हिजन लेव्हल अर्थात राज्यस्तरीय थ्रो बाॅल स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला. या टीममध्ये कुमारी.अशीया मुल्ला ही संघ कॅप्टन होती तर कु. आशा प्रमाण, अस्मिता पाटील, सातुली गावकर, गीता डिगेकर, वरूणा पोटे, समीक्षा गावकर, प्रेमिला मेंडीलकर, वर्षा मेंडीलकर, सानिका सावंत, जनाबाई किणयेकर.
या खेळूंना उत्तम खेळ खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या शाळेच्या क्रीडा शिक्षिका श्रीमती आश्विनी टी पाटील यांचं अचूक मार्गदर्शन लाभत असून, मुख्याध्यापक श्री राहूल एन जाधव यांचे प्रोत्साहन लाभत आहे. मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री शिवाजीराव पाटील व श्री परशराम गुरव यांनी या यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले असून प्राचार्य ए एल पाटील व शाळेतील सर्व शिक्षकांचे मौलिक मार्गदर्शन या खेळाडूना वेळोवेळी मिळत आहे.