
विजापूरचे चालता बोलता देव म्हणून ओळखले जाणारे ज्ञान योगाश्रमचे सिध्देश्वर स्वामी यांचे दुःखद निधन झाले . त्यांना बेळगावचे रांगोळी कलाकार अजित औरवाडकर् यांनी रांगोळीद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
सदर रांगोळी त्यांनी वडगाव येथील
ज्योती फोटो स्टुडिओ मध्ये रेखाटलेली आहे . सदर रांगोळी दोन फूट बाय दोन फूट आकाराची आहे.ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना सात तासाचा कालावधी लागला आहे.लेक कलरचा वापर त्यांनी रांगोळी काढण्यासाठी केला आहे. दि.३ ते ६ जानेवारी पर्यंत जनतेला सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत रांगोळी पाहता येईल.
