कर्नाटकात दहावीच्या परीक्षेला शुक्रवार पासून प्रारंभ झाला असून राज्यात दहावीचे 8.42 लाख विद्यार्थी आहेत.राज्यात 3305 परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे.बेळगाव जिल्ह्यातील एकशे वीस केंद्रावर दहावीची परीक्षा सुरू झाली.बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातून 33000 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.परीक्षा केंद्राच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
पंधरा एप्रिल पर्यंत दहावीची परीक्षा चालणार आहे.शुक्रवारी पहिला पेपर मातृभाषेचा होता.सकाळी 10-30 ते दुपारी 1-45 या वेळेत परीक्षा झाली.विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी गणवेश घालून येणे सक्तीचे केले आहे. हिजाब घालून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना एक तास अगोदर उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली होती.परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स दुकाने परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करण्याची परिवहन मंडळाने परवानगी दिली आहे.