
टेनिस हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी मराठा मंडळ ताराराणी कॉलेजच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय निवड.
खानापूर ; मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर च्या विद्यार्थीनींनी, यरगट्टी येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत घवघवीत यश मिळविले असून, या कॉलेजच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या कॉलेजच्या विद्यार्थिनी कुमारी सोनीया घाडी, कुमारी दीक्षा शिरोडकर, कुमारी मनीषा बरूकर यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे या त्यांच्या उज्ज्वल यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या विद्यार्थिनींना मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू, ज्येष्ठ संचालक परशराम गुरव, शिवाजीराव पाटील यांचे त्यांना प्रोत्साहन लाभले आहे. तर कॉलेजचे प्राचार्य श्री अरविंद पाटील व सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन त्यांना लाभत असून, क्रीडाप्रेमी मार्गदर्शक, श्री भिमशी व कमिटी चेअरमन प्रा. श्रीमती एम वाय देसाई, हे राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत यशोमय झेंडा फडकविण्यासाठी विद्यार्थिनींचा कसून सराव घेत आहेत.
