
नाग, नागीण (kobra)च्या बऱ्याच गोष्टी तुम्ही चित्रपटात पहिल्या असतील. चित्रपटात असे दाखवले जाते की नागाला काही लोक मारतात आणि नागीण नागाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी परत येते.
अशाच काही प्रकारची सत्य गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पानिपत-खटिया हायवे वर एका पुलाचे काम चालू आहे आणि त्या ठिकाणी मातीचे खनन चालू असताना एक अशी घटना घडली जी पाहून स्थानिक लोक थक्क झाले. खनन करते वेळी एक कोब्रा जेसीबी मध्ये अडकून मरण पावला.त्यानंतर तिथे एक नागीण नागाचा बदला घ्यायला पोहोचली ते पाहून तेथील कामगारांना अतिशय भीती वाटू लागली. नागीण नागाच्या मृत्यू नंतर जणू संतापली होती आणि तिने जेसीबी वर कब्जा केला.जेसीबी वर काम करणारे सर्व कर्मचारी घाबरले आणि जेसीबी सोडून पळू लागले. ही नागीण २४ तास एकाच जागी बसून फुंकारी मारत होती आणि मग यादरम्यान तेथे लोकांची अफाट गर्दी जमू लागली.
नंतर अखेरीस एका साप पकडणाऱ्या व्यक्तीला बोलावण्यात आले. त्या व्यक्तीने खूप मेहनतीने नागिणीला आपल्या नियंत्रणात आणले.
डोळ्यासमोर मृत्यूचे दृश्य दिसत होते………..
शुक्रवारच्या सकाळी काही कामगार माती खनन साठी पोहोचले होते. त्या जागेवर खूप सारे साप निघाले होते आणि त्यातलाच एक साप जेसीबीत अडकून मरण पावला.
या मेलेल्या सापाला एका नाल्याच्या शेजारी टाकले आणि मग ते जेसीबीवरच बसून जेवण करू लागले आणि जेसीबीचा चालक जेवणासाठी पहिला घास खाणारच तेवढ्यात त्याला समोर एक नागीण फणा काढून असलेली समोर दिसली.
हे दृश्य पाहून स्थानिक कामगारांना खूप भीती वाटू लागली. जणू काही मरण त्यांच्या डोळ्यासमोरच आहे . नागीण त्यांच्या पासून २ फुटाच्या अंतरावर फणा काढून होती.
ते पाहून जेसीबी वरून चालकाने एकदम खाली उडी मारली आणि सर्वांनी तेथून धूम ठोकली. सर्वांमध्ये नागिणीची दहशत बसली होती.ही बातमी गावभर पसरली आणि या जागी लोकांची गर्दी झाली. बऱ्याच लोकांनी नागिणीला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना ते शक्य झाले नाही.
नागीणला पकडण्यासाठी बोलावण्यात आले किशनला-….
अखेर नागिणीला पकडण्यासाठी जनपद मुरादाबाद येथील कनपूर डिलारी येथील निवासी किशन पुत्र राम सिंहला बोलावण्यात आले.
दीड तासानंतर नागिणीला पकडण्यात त्याला यश मिळाले. सर्व ग्रामस्थांनी मिळून त्याला पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले. तो त्या नागीणला आपल्या सोबत घेऊन गेला. किशन गेली २० वर्ष साप पकडण्याचे काम करत आहे. त्यामुळे त्याला सापांच्या सर्व सवयी परिचित आहेत.
