घरांची पडझड झालेल्याना पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे शिवस्वराज्य जनकल्याण फाउंडेशन तर्फे तहसीलदारांना निवेदन
खानापूर ; खानापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे घरे पडून बेघर झालेल्यांना तात्काळ निवारा व अनुदान देण्यात यावीत तथा घरांच्या झालेल्या पडझडीसाठी, जास्तीत जास्त पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावीत, व खानापूर तालुक्याला, ओला दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करावा या मागणीसाठी, खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड, यांना “शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशन” खानापूर यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. याचबरोबर सरकारने, शेतकऱ्यांच्यासाठी विविध योजनांवर, सुरू असलेली सबसिडी बंद केली असून, ती पुन्हा सुरू करण्यात यावीत, या मागणीसाठी शेतकी विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शेतकी विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन सादर..
यंदा सन 2024 सालच्या जून आणि जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये खानापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी होऊन अनेक गावांमध्ये घरांची पडझड झालेली आहे. अशा घरांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना निसर्गाचा कोप सोसावा लागला आहे. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची घरे पडून गेल्यामुळे ते बेघर झाले आहेत. त्यांना शासनातर्फे अधिकाधिक आर्थिक दिलासा मिळावा अशी आमची अपेक्षा आहे.
अतिवृष्टीमुळे बेघर झालेल्या नागरिकांना त्वरीत निवारा उपलब्ध करून द्यावा व यासाठी अनुदान मंजूर करण्यात यावे. तसेच शासकीय अधिकारी पाठवून पंचनाम्याअंती ठरविण्यात येणारी व मागील काळात दिली गेलेली पाच लाख रुपये अशी नुकसान भरपाईची रक्कम ही
बांधकाम साहित्याचे तत्कालीन दर लक्षात घेऊन ठरविण्यात आली होती. मात्र आता बांधकाम साहित्याचे दर वाढलेले असल्यामुळे मागील दरानेच नुकसान भरपाई देणे योग्य होणार नाही. त्यामुळे बांधकाम साहित्याचे चालू दर लक्षात घेऊन नुकसान भरपाईचा आकडा ठरविण्यात यावा. या शिवाय ज्या घरांची सद्यस्थितीत पडझड झाली आहे. अशा घरांना पावसाळ्यात अजून पुढे सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे त्या घरांची आणखी पडझड होणार हे निश्चित आहे. या कारणास्तव पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी, ही संभाव्य गोष्ट लक्षात घेऊन पडझडीचा केवळ बांधकाम साहित्याचे तत्कालीन दर लक्षात घेऊन ठरविण्यात आले होते. मात्र आता बांधकाम साहित्याचे दर वाढलेले असल्यामुळे मागील दरानेच नुकसान भरपाई देणे योग्य होणार नाही. त्यामुळे बांधकाम साहित्याचे चालू दर लक्षात घेऊन नुकसान भरपाईचा आकडा ठरविण्यात यावा.
या शिवाय ज्या घरांची सद्यस्थितीत पडझड झाली आहे अशा घरांना अजून पाऊसकाळाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे त्या घरांची आणखी पडझड होणार हे निश्चित आहे. या कारणास्तव पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ही संभाव्य गोष्ट लक्षात घेऊन पडझडीचा केवळ सद्यस्थितीचा पंचनामा न नोंदवता येणाऱ्या कालावधीमध्ये घरांच्या उर्वरित भागाचेही होणारे अटळ नुकसान देखील गृहित धरून ते नोंदवावे व त्याची रितसर दखल म्हणून एकुण नुकसान वाढीव स्वरूपात नोंदवावे. यामुळे नुकसानाची योग्य नोंद केल्यासारखे होईल. अन्यथा पंचनामा अर्धवट आणि मोबदलाही अर्धवट ! अशी चूक होऊ नये ही दक्षता घ्यावी.
या व्यतिरिक्त झालेले नुकसान ग्राह्य धरण्याची जी शासनाची श्रेणी / वर्गवारी A, B, C इत्यादि आहे, त्यात बदल किंवा ती रद्द केल्याचे बोलले जात आहे. असे असल्यास झालेल्या नुकसानाची काय श्रेणी / वर्गवारी केली जाणार आहे याबाबत जाहीर खुलासा करण्यात यावा.
अंतिमतः यंदा पावसाच्या मोसमात सरासरीपेक्षा अतिरिक्त पाऊस पडत असल्याने खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावोगावी घरांची पडझड तर झालीच पण पावसाचा फटका शेतकरी वर्गाला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतवडीत पाणी शिरल्याने अनेकांच्या रोप/बी/ बियानांची लागवड वाहून गेली आहे. अनेक गरीब शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे, कैक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांवर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्याचबरोबर जनावरांना मिळणारा चारादेखील पावसाच्या पाण्यामुळे कुजत आहे. असा ओला दुष्काळ ओढवलेला आहे. त्यामुळे खानापूर तालुक्याला ओला दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यात यावे.
वरील बाबी ध्यानात घेऊन खानापूर तालुक्यातील विविध गांवच्या नुकसानग्रस्त पिडित रहिवाश्यांना विनाविलंब पंचनामा करून अधिकाधिक 5 लाखांपेक्षा जास्त नुकसान भरपाई द्यावी, तसेच बेघरांना निवारा व अनुदान त्वरित मंजूर करावे, आणि, खानापूर तालुक्याला ओला दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करावे अशी शिवस्वराज जनकल्यान फाउंडेशन, खानापूर विनंती करीत आहे. या अनुशंगाने आपण योग्य ती कारवाई करावीत असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई, कार्याध्यक्ष रमेश धबाले, सरचिटणीस बाळासाहेब शेलार, रणजीत पाटील, मारूती पाटील व आदीं कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
ಶಿವರಾಜ್ಯ ಜನಕಲ್ಯಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ’ದಿಂದ ತಹಸೀಲ್ದಾರರಿಗೆ ಮನೆ ಕುಸಿದವರಿಗೆ ಐದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಸಹಾಯಧನ ನೀಡಬೇಕೆಂದು ಮನವಿ ನೀಡಿದರು
ಖಾನಾಪುರ; ಅತಿವೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮನೆ ಕಳೆದುಕೊಂಡವರಿಗೆ ಕೂಡಲೇ ನಿವೇಶನ ಹಾಗೂ ಸಹಾಯಧನ ನೀಡಬೇಕು ಹಾಗೂ ಮನೆ ಕುಸಿದ ವರಿಗೆ ಐದು ಲಕ್ಷ ರೂ.ವರೆಗೆ ಪರಿಹಾರ ನೀಡಬೇಕು ಹಾಗೂ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕನ್ನು ತೇವ ಮತ್ತು ಬರಪೀಡಿತ ತಾಲೂಕು ಎಂದು ಘೋಷಿಸಬೇಕು ಎಂಬ ಮನವಿ ಖಾನಾಪುರ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಪ್ರಕಾಶ ಗಾಯಕವಾಡ. -ಅವರಿಗೆ ಜನಕಲ್ಯಾಣ ಫೌಂಡೇಶನ್” ಖಾನಾಪುರ ವತಿಯಿಂದ ಮನವಿ ನೀಡಲಾಯಿತು. ಇದೇ ವೇಳೆ ಸರಕಾರ ರೈತರಿಗೆ ನೀಡುತ್ತಿರುವ ನಾನಾ ಯೋಜನೆಗಳ ಅನುದಾನವನ್ನು ಸ್ಥಗಿತಗೊಳಿಸಿದ್ದು, ಪುನರಾರಂಭಿಸಬೇಕು ಎಂಬ ಬೇಡಿಕೆ ಕೃಷಿ ಇಲಾಖೆ ಕಚೇರಿಯ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಮೂಲಕ ನೀಡಲಾಯಿತು.