शीवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी परवा खानापूर येथे येऊन के पी पाटील हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नाहीत त्यांची शीवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, असे वक्तव्य केले आहे, त्या वक्तव्याचा शीवसेनेचे खानापूर विधानसभेचे उमेदवार के पी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन खंडण केले आहे,
पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की, के पी पाटील शीवसेनेचे अधिकृत उमेदवार नाहीत त्यांचा शीवसेनेशी काही संबंध नाही म्हणता तर तुम्ही मला बी फॉर्म कशाला दिला असा प्रति प्रश्न के पी पाटील यांनी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांना केला आहे,राऊत साहेब तुम्ही मला बी फॉर्म दिल्यामुळेच मी निवडणुकीला उभा राहिलो असून निवडणूक अधिकारीनी मला शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून पत्र पण दिले आहे, व निवडणूक पत्रिकेत चार नंबरला माझे नाव पण आले असून मला नीशानी म्हणून शीवसेनेचे मशाल चिन्ह मिळाले आहे, असे असताना तुमच्या सारख्या जेष्ठ नेत्यांने असे चुकीचे वक्तव्य करून लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करणे हे चुकीचे असल्याचे मत के पी पाटील यांनी व्यक्त केले आहे,माझा प्रचार जोरदार सुरू असून तालुक्यातून मला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मी निवडणूक रिंगणातून अजीबात माघार घेणार नसल्याचे सांगितले, व या पुढे मराठी संस्कृती व मराठीच्या रक्षणासाठी माझे अविरत कार्य सुरूच राहणार असल्याचे सांगितले,