
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे राजा शिवछत्रपती शिवस्मारक खानापूर येथे मार्गदर्शन शिबिर,
खानापूर ; सीमा भागातील 865 खेड्यांमधील विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून मिळणाऱ्या सवलतींचा सारांश डॉ श्रीपाल गायकवाड, डॉ नवनाथ वलेकर, डॉ कविता वड्राळे यांच्याकडून सीमा भागातील 865 खेड्यांमधील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून मिळणाऱ्या सर्व सवलतीचा सारांश छत्रपती शिवस्मारक खानापूर येथे मार्गदर्शन करण्यात आले या मार्गदर्शक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोपाळ देसाई अध्यक्ष महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर, गोपाळ मुरारी पाटील सदस्य मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव, मुरलीधर गणपती पाटील कार्याध्यक्ष महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर, चिटणीस आबासाहेब दळवी, माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, खजिनदार संजीव पाटील, रिटायर्ड शिक्षक हेब्बाळकर गुरुजी, अर्बन को-ऑपरेटिव बँक खानापूरचे अध्यक्ष अमृत शेलार, राजाराम देसाई, पुंडलिक पाटील, अजित पाटील, एडवोकेट केशव कळेकर तसेच अनेक विद्यार्थी पालक कार्यक्रमाला उपस्थित होते.
या मार्गदर्शन शिबिराला सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रणजीत पाटील सहचिटणीस महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर यांनी केले.
