
खानापूर : गुंजी येथील सरकारी मराठी माध्यमिक शाळेच्या 10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुंजी ग्रां पं चे माजी चेअरमन, शाळेच्या एस डी एम सी कमिटीचे उपाध्यक्ष सुभाष मीनाप्पा घाडी हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते दिपकराव देसाई, निखील सोज, चोपडे सर, संतोष गुरव, माजी ग्रां पं अध्यक्षा सुनीता घाडी, मुख्याध्यापक उतूरकर सर, एच एन सर, शिक्षक व विद्यार्थी वृंद उपस्थित होता,

या कार्यक्रमाला उद्देशून सामाजिक कार्यकर्ते दिपकराव देसाई, निखील सोज, सुभाष घाडी, उतूरकर सर, यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले,

यावेळी विवीध क्रीडा स्पर्धेत भाग घेवुन यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले, तसेच आदर्श विद्यार्थी व आदर्श वीद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला,
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पावसकर सर यांनी केले, तर जाधव सर यांनी आभार प्रदर्शन केले,
