
खानापूर : रामगुरवाडी सीआर सी येथे कलिका कार्यक्रम संपन्न
क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय खानापूर व क्षेत्र समन्वय अधिकारी कार्यालय खानापूर तसेच सी, आर, सी. रामगुरवाडीच्या वतीने कलिका हब्ब (अध्ययन महोत्सव) हा कार्यक्रम दिनांक 23 व 24 जानेवारी 2023 रोजी सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा रामगुरवाडी येथे साजरा करण्यात आला.
गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कलिका चेतरीके अभ्यासाचा एक भाग ‘कलिका हब्ब ‘या कार्यक्रमाद्वारे प्रत्यक्ष कृतीतून मिळविलेले ज्ञान कायम स्वरुपी टिकून राहते याकरिता करा व शिका या धर्तीवर कलिका हब्ब अर्थात अध्ययन महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे
कार्यक्रमाची सुरुवात कलिका हब्ब या गीताने करण्यात आली. कळशी, झेंडा व घोषणा फलक घेऊन विद्यार्थीनीं व विद्यार्थी दींडिचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्यामागून टाळ मृदंगाच्या गजरात विविध शाळांचे विद्यार्थी लेझीम , टिपरी ,रिंग व झांज पथकामुळे गावात उत्सवाचे वातावरण पसरले होते. घोषणा व प्रात्यक्षिकासह व ट्रॅक्टर सुशोभीकरण करून दिंडी पुढे जात होती. गावच्या मध्यस्थानी रिंगण सोहळा व पथकांनी आपले प्रात्यक्षिक दाखविले . सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग गावातील वारकरी एसडीएमसी आणि युवा वर्ग सामील झाले होते.या दर्दी दिंडीचे सांगता मराठी शाळेकडे करण्यात आली. यानंतर विविध घोषणा देऊन कलिका जागृती करण्यात आली
कलिका हब्ब कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. नागापा कल्लाप्पा गुरव ह भ प राम्गूरवाडी हे होते. क्षेत्र शिक्षणाधिकारी श्रीमती राजेश्वरी कुडची मॅडम, पि.ई.वो. मिरजे मॅडम शिक्षण संयोजक लोकापुरे मॅडम शिक्षण संयोजक श्रीमती क्रांती पाटील मॅडम सौ मेघा कुंदरगी संस्थापिका मलप्रभा विद्यानिकेतन कन्नड शाळा गांधीनगर श्री शंकर कम्मार आय आर टी श्री बी एन चचडी बी.आर.पी,ग्रामपंचायत उपाध्यक्ष श्री बाबू ईश्वर शिंदे, ग्रामपंचायत सदस्या दीपिका मोटर सौ अंजली ठोंबरे सौ अनिता बाळन्नवर, श्री असिफ आत्तार ग्रामपंचायत सदस्य हलकर्णी त्याचप्रमाणे पि डि ओ. श्री संजीव ऊप्पीन सर हलकर्णी ग्रामपंचायतच्या पीडिओ श्रीमती रेश्मा पाणीवाले सेक्रेटरी सोज नोडल ऑफिसर श्री मदन भावे मुख्याध्यापक निलावडे रामगुरवाडी एस.डी.एम.सी. अध्यक्ष श्री गंगाराम शिवाजी शिंदे, उपाध्यक्षा सौ रेणुका ना. निकलकर सदस्य श्री शिवाजी विठ्ठल ठोंबरे श्री शंकर नारायण मोटर श्री सुनील नारायण दळवी श्री मोहन नारायण कदम श्री गंगाधर म. ठोंबरे श्री मारुती हु. शिंदे श्री संदीप देवाप्पा धबाले श्री प्रमोद गोविंद दळवी सदस्या सौ. रेणुका मारुती शिंदे सौ नीता नामदेव माळवे सौ मानसी मंगेश गुरव सौ रूपाली बाळू गुरव सौ रेणुका भु. गुरव सौ राधिका बाबू ठोंबरे सौ राधिका ना हडिलगेकर सौ रेश्मा गजानन ठोंबरे मुडेवाडी शाळेचे अध्यक्ष श्री.परशराम पुं.चौगुले, हत्तरगुंजी शाळेचे अध्यक्ष श्री सातेरी सुंटकर सी.आर.पी. सौ.रुपाली पवार मॅडम तसेच मुख्याध्यापक श्री ए आर भोसले श्री बबन महादेव पाटील मुख्याध्यापक हत्तरगुंजी, श्रीमती नीलम शेटकर मुख्याध्यापिका हलकर्णी श्री शिवानंद कुंदरगी मुख्याध्यापक गांधीनगर श्री. एम एच कुगजी मुख्याध्यापक डुक्करवाडी श्री एम.व्ही. चोर्लेकर मुख्याध्यापक मुडेवाडी श्री राजू रणदिवे मुख्याध्यापक शिवाजीनगर बी.के तळवार गांधीनगर सौ. सविता काटगाळकर मुख्याध्यापिका बाचोळी सौ जयश्री मुरगोड मुख्याध्यापिका हरसनवाडी मुख्याध्यापिका फडके मन्सापूर तसेच आर. पी. श्रीमती आर.टी. क्षीरसागर मॅडम हातरगुंजी श्री आर एम केल्लेकर सहशिक्षक हरसनवाडी सौ आर पी कलम सहशिक्षिका हलकर्णी श्रीमती एस.एच. सनदी सहशिक्षिका रामगुरवाडी श्री आर बी रणदिवे सहशिक्षक शिवाजीनगर श्री के.जी कुंभार सौ.एम.एस.पाटील श्रीमती जी.एस.पाटील श्री.एस.पी.कांबळे श्रीमती एस आर सक्रन्नावर श्री डी वाय मकानदार उपस्थित होते. कार्यक्रमाला पंचकमिटी, सर्व मंडळ, शिक्षण प्रेमी, मा.विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.रुपाली पवार ही.आर.पी., सुत्रसंचलन श्री.एम.व्ही.चोर्लेकर सर व आभार प्रदर्शन श्री.बाबू शिंदे यांनी केले.
उद्घाटन कार्यक्रमानंतर चार कोपऱ्यातील कृतीयुक्त शिक्षणाला सुरुवात झाली. विविध प्रकारच्या चार कोपऱ्यामध्ये 21 ऍक्टिव्हिटी करून दाखवून विद्यार्थ्याकडून करून घेतल्या .त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा चारही कोपऱ्यातील वर्ग अध्ययन अध्यापनाला सुरुवात झाली विद्यार्थी आनंदाने मोठ्या उत्साहाने कृतीयुक्त पाठ शिकत होते. संध्याकाळी एसडीएमसीच्या उपस्थितीत सहभागी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व पेन देऊन गौरविण्यात आले आणि शेवटी कार्यक्रमाचे सांगता वंदे मातरम ने करण्यात आली.
