
रूमेवाडी क्रॉस वर विनापरवाना पोस्टर बाजीला ऊत आला असून करंबळ ग्राम पंचायीचे दुर्लक्ष झाले असून ग्रां पं पीडिओ, कर्मचारी वर्ग झोपेचे सोंग घेतलेत काय असा संतप्त सवाल येथील नागरिक करत,
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रुमेवाडी क्रॉस वर इच्छूक उमेदवार रोज नव नव्या कार्यक्रमाची जाहिरात आणि शुभेच्छा देण्यासाठी भले मोठे बँनर लावत असून, नियमानुसार ग्राम पंचायतीचा परवाना घेणे आवश्यक आहे. पण याकडे दुर्लक्ष करून ठिकठिकाणी बँनर लावत असून यामुळे व्यवसायिक आणि प्रवाश्यांना याचा नाहक त्रास होत आहे. त्यातच काल दुपारी एक बँनर रस्त्यावर पडून शिवरात्रीनिमित आलेल्या भक्तांना अडचणीचा सामना करावा लागला . तरी संबंधित पंचायत अधिकार्यानी याकडे लक्ष द्यावेत अशी नागरिकातून मागणी होत आहे
