आपला हिंदू धर्म जगामध्ये श्रेष्ठ धर्म म्हणून ओळखला जातो पण हिंदू धर्मामध्ये अनेक जाती पोट जाती निर्माण झाल्यामुळे आमचा हिंदू धर्म विखुरला गेला आहे त्यासाठी सर्वांनी आपापल्या जाती पाती बाजूला ठेवून हिंदू धर्मीय म्हणून एकत्र आले पाहिजे असे संबोधन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उतर कर्नाटक कार्यवाह राघवेंद्र कागवाडजी यांनी काल बुधवार दि 21 डिसेंबर रोजी आर एस एस च्या वतीने हिंदू धर्मात वेगवेगळ्या जातीत वीखरलेल्या वेगवेगळ्या जातींच्या प्रमुख नागरिकांच्या बैठकीत शुभम गार्डन येथे केले,
पुढे बोलताना ते म्हणाले की हिंदू धर्मातील जाती पातीत निर्माण केलेल्या भिंती सर्वानी मोडून काढून यापुढे आपण फक्त हिंदू धर्मीय म्हणून एकत्र आले पाहिजे हि काळाची गरज आहे व राष्ट्र हिताचे असल्याचे ते म्हणाले
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक पदाधिकारी सदानंद कपिलेश्वरी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात शार्दुल जोशी व त्यांच्या साथीदारांनी श्लोक म्हणून केली, स्वागत व सुत्रसंचालन स्वयंसेवक सुभाष देशपांडे यांनी केले तर आभारप्रदर्शन दिपक वाळवे यांनी केले, बैठकीला हिंदू धर्मातील वेगवेगळ्या जातीतील प्रमुख नागरिक तसेच संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते,