
खानापूर श्री मलप्रभा नदीच्या पाण्याच्या पात्रात बुडून सुनील चंद्राप्पा तलवार मुळगाव अशोक नगर ता खानापूर सध्या राहणार भट गल्ली खानापूर याचा मृत्यू झाला असून त्याचा शोध खानापूर अग्निशामक दलाचे जवान व पोलीस घेत असून अजून मृतदेह हाती मिळाला नाही या ठिकाणी अग्निशामक दलाचे जवान व काही नागरिक पाण्याच्या पातळीत उतरून मृतदेहाचा शोध घेत आहेत बुडालेल्या सुनील तलवार यांच्या पश्चात पत्नी व तीन वर्षाची व दोन वर्षाची दोन मुलं आहेत या ठिकाणी त्यांची पत्नी व त्यांचे नातेवाईक उपस्थित आहेत ते शोक व्यक्त करत हंबरडा फोडत आहेत
