मलप्रभा नदी पूल ते मुघवडा क्रॉस पर्यंत च्या रस्त्याची दुरुस्ती त्वरित करा ; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांचे निवेदन.
खानापूर ; खानापूर-जांबोटी मार्गावरील कान्सुली क्रॉस ते मुघवडे मार्गावर असलेल्या मलप्रभा नदी पुलापासून ते मुघवडे क्रॉस पर्यंत असलेल्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, संपूर्ण रस्त्यावर खाच खळगे पडले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. त्यासाठी या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी निलावडे ग्रामपंचायतचे अध्यक्ष अरुण गावडे व या भागातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता संजय गस्ती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येत्या चार दिवसात या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा आंदोलनात्मक मार्ग हाती घेण्यात येईल असा इशारा या भागातील ग्रामस्थांनी दिला आहे.
रस्ता नादुरुस्त झाल्याने या भागातील आंबोळी, निलावडे, बांदेकरवाडा, मुघवडे, कोकण वाडा, कबनाळी, मळव या भागातील नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यासाठी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पुढील आठवड्यात आंदोलनात्मक भूमिका हाती घेण्याचा इशारा यावेळी या भागातील ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी निलावडे ग्रामपंचायत अध्यक्ष अरुण गावडे, राजाराम कांबळे, शिवाजी पार्सेकर, गणपती पार्सेकर, शिवाजी कोळेकर, निंगाप्पा पार्सेकर, भुजंग पार्सेकर, महादेव पार्सेकर, हणमंत पार्सेकर व आदीजण यावेळी उपस्थित होते.
मलप्रभा नदी पूल ते मुघवडे क्रॉसपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती त्वरित करा; नागरिकांचे पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना निवेदन
खानापूर : खानापूर-जांबोटी मार्गावरील कान्सुली क्रॉस ते मुघवडे या दरम्यानच्या मलप्रभा नदी पुलापासून ते मुघवडे क्रॉसपर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी भरून गेला आहे. या दुर्दशेमुळे नागरिक, शालेय विद्यार्थी व वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी निलावडे ग्रामपंचायत अध्यक्ष अरुण गावडे आणि स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता संजय गस्ती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, चार दिवसांत रस्ता दुरुस्तीची कामे सुरू न झाल्यास आंदोलनात्मक पाऊल उचलले जाईल.
रस्ता नादुरुस्त झाल्याने आंबोळी, निलावडे, बांदेकरवाडा, मुघवडे, कोकणवाडा, कबनाळी, मळव या भागातील रहिवासी आणि विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रसंगी अरुण गावडे, राजाराम कांबळे, शिवाजी पार्सेकर, गणपती पार्सेकर, शिवाजी कोळेकर, निंगाप्पा पार्सेकर, भुजंग पार्सेकर, महादेव पार्सेकर, हणमंत पार्सेकर आदी ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.
ಮಲಪ್ರಭಾ ನದಿ ಸೇತುವೆಯಿಂದ ಮುಘವಡೆ ಕ್ರಾಸ್ವರೆಗೆ ರಸ್ತೆ ತುರ್ತು ದುರಸ್ತಿ ಮಾಡಬೇಕೆಂದು; ನಾಗರಿಕರಿಂದ ಪಿಡಬ್ಲ್ಯುಡಿ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ
ಖಾನಾಪುರ : ಖಾನಾಪುರ–ಜಾಂಬೋಟಿ ಮಾರ್ಗದ ಕಾನ್ಸುಲಿ ಕ್ರಾಸ್ನಿಂದ ಮುಘವಡೆವರೆಗೆ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಲಪ್ರಭಾ ನದಿ ಸೇತುವೆಯಿಂದ ಮುಘವಡೆ ಕ್ರಾಸ್ವರೆಗೆ ಇರುವ ರಸ್ತೆ ತುಂಬಾ ದಯನೀಯ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದೆ. ಸಂಪೂರ್ಣ ರಸ್ತೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಗುಂಡಿಗಳಿಂದ ತುಂಬಿ ಹೋಗಿದ್ದು, ನಾಗರಿಕರು, ಶಾಲಾ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಹಾಗೂ ವಾಹನ ಚಾಲಕರು ದೈನಂದಿನ ಪ್ರಯಾಣದಲ್ಲಿ ಪ್ರಚಂಡ ತೊಂದರೆ ಅನುಭವಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ.
ಈ ರಸ್ತೆಯ ತಕ್ಷಣ ದುರಸ್ತಿ ಮಾಡಬೇಕೆಂದು ನಿಲಾವಡೆ ಗ್ರಾಮಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅರುಣ ಗೌಡೆ ಹಾಗೂ ಸ್ಥಳೀಯ ನಾಗರಿಕರು ಸಾರ್ವಜನಿಕ ನಿರ್ಮಾಣ ಇಲಾಖೆಯ ಸಹಾಯಕ ಅಭಿಯಂತರ ಸಂಜಯ ಗಸ್ತಿ ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ.
ನಾಗರಿಕರು “ನಾಲ್ಕು ದಿನಗಳೊಳಗೆ ರಸ್ತೆ ದುರಸ್ತಿ ಕಾಮಗಾರಿ ಆರಂಭವಾಗದಿದ್ದರೆ ಆಂದೋಲನಾತ್ಮಕ ಹೋರಾಟ ಆರಂಭಿಸಲಾಗುವುದು” ಎಂದು ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ.
ರಸ್ತೆ ಕೆಟ್ಟ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ಆಂಬೋಳಿ, ನಿಲಾವಡೆ, ಬಾಂದೇಕರವಾಡಾ, ಮುಘವಡೆ, ಕೊಂಕಣವಾಡಾ, ಕಬನಾಳಿ, ಮಳವ ಮುಂತಾದ ಭಾಗದ ನಿವಾಸಿಗಳು ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಪ್ರತಿ ದಿನ ಜೀವ ಮುಷ್ಟಿಯಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಸಂಚಾರ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾಗರಿಕರಲ್ಲಿ ತೀವ್ರ ಅಸಮಾಧಾನ ವ್ಯಕ್ತವಾಗಿದೆ.
ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅರುಣ ಗೌಡೆ, ರಾಜಾರಾಮ ಕಾಂಬಳೆ, ಶಿವಾಜಿ ಪಾರ್ಸೆಕರ, ಗಣಪತಿ ಪಾರ್ಸೆಕರ, ಶಿವಾಜಿ ಕೊಳೆಕರ, ನಿಂಗಪ್ಪ ಪಾರ್ಸೆಕರ, ಭುಜಂಗ ಪಾರ್ಸೆಕರ, ಮಹಾದೇವ ಪಾರ್ಸೆಕರ, ಹನುಮಂತ ಪಾರ್ಸೆಕರ ಸೇರಿದಂತೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹಾಗೂ ನಾಗರಿಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.

