बेळगाव : पुन्हा एकदा ऑडिओ बॉम्बने राज्याच्या राजकारणात खळबळ उडण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. सीडी बॉम्ब प्रकरणामुळे अडचणीत आलेले भाजप आमदार रमेश जारकीहोळी यांनी ऑडिओ बॉम्ब फोडण्याची तयारी केली आहे.थोड्याच वेळात रमेश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. यावेळी रमेश जारकीहोळी कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून राहणार आहे.
रमेश जारकीहोळी यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांचे राजकीय अस्तित्व आपणच संपवणार असल्याचे सांगितले होते. सिद्धरामय्या यांना शिवकुमार यांच्यापासून चार हात लांब राहवे असा सल्लाही रमेश जारकीहोळी यांनी दिला होता. त्यानंतर आता आज सोमवारी सकाळी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रमेश सारखे होईल कोणता बॉम्ब फोडणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून राहणार आहे.