नंदगड : कर्नाटक राज्यातील रथ क्रमांक 2 या रथयात्रेला आज नंदगड येथील संगोळी रायान्ना समाधि स्थळाला अभिवादन करून वीजयसंकल्प रथयात्रेच्या रथाची पुजा करून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते झेंडा दाखवुन ढोल वाजवुन 20 हजार पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली, यावेळी व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई,भाजपा राज्य अध्यक्ष नवीन कुमार कटील, पालक मंत्री गोविंद कारजोळ, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आमदार रमेश जारकीहोळी, मंत्री शिवराम हेब्बार, मंत्री शशिकला जोल्ले, खासदार मंगला अंगडी, सी सी पाटील, मुर्गेश निराणी, आमदार अभय पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पाटील, आमदार अनील बेनके, आमदार महेश कुमठळी, मंत्री भैरटी बसवराज, खासदार इराण्णा कडाडी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालूका अध्यक्ष संजय कुबल व आदी नेतेमंडळी उपस्थित होते,
यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की कर्नाटक राज्य हे वीरभुमी राज्य म्हणून ओळखले जाते या ठिकाणी अनेक वीरपुरूष व स्वातंत्र्य सेनानी जन्माला आले असुन युध्दात पराक्रम गाजवलेले फील्ड मार्शल करिअप्पा हे सुद्धा याच भुमीत जन्मले आहेत, पुढे बोलताना त्यांनी देशात मोदी सरकारने अमलात आणलेल्या योजनांची माहिती देताना म्हणाले की देशात जवळपास 3 लाख 50 हजार लाख की मी रस्ते बनवुन ग्रामीण क्षेत्राला जोडले आहेत, शिमोगा येथे हेलीकॉप्टर व लढावु विमाने बनविण्याचा प्रोजेक्ट बनवण्यात येणार असल्याचे सांगितले, प्रत्येक वस्तू घ्यायची असेल तर बाहेरील देशावर अवलंबून रहावे लागत होते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाहेरील देशावर अवलंबून न राहता युध्द सामुग्री राहू देत कींवा विमाने राहू देत कींवा ईतर गोष्टी सगळ्या भारतात बनविण्यास सुरुवात केली आहे, 60 वर्षांत कॉग्रेस ला जे जमल नाही ते 9 वर्षात भाजपा च्या नरेंद्र मोदी सरकारने करून दाखवले आहे तसेच मोबाईल वरून पैसे पाठवीणे मागुन घेणे देवान घेवान करणे सोपे झाले असून सरकारी मदत प्रत्येकाच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन जमा करण्यात येत असल्याने भ्रष्टाचार कमी झाला आहे, हर घरमे पाणी, हर खेतमे पाणी योजना राबविण्यात येत आहे तसेच मोदी सरकारने तलाख प्रथा बंद करून मुस्लिम महिलांना न्याय मिळवून दिला आहे,
कोरोना बद्दल हार्वर्ड युनिव्हर्सिटी ने एक सर्वे केला असून भारतात मोदि सरकारने सर्वाना कोरोना प्रतिबंधीत लस मोफत दिल्याने मृत्यूचा आकडा कमी झाला आहे जर लसीकरण मोहिम राबविली नसती तर 39 हजार लोक मृत्यूमुखी पडले असते असे सर्वेत म्हटले आहे त्यासाठी या सर्व बाबींचा विचार करून येत्या विधान सभा निवडणुकीत भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले,
यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बोलताना म्हणाले की कॉग्रेस पक्ष देशात जाती पातीत भांडणे लावुन राजकारण करत असून ते खपवून घेतले जाणार नाही यापुढे कॉग्रेस मुक्त अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगितले,
वीजय संकल्प रथयात्रा यशस्वी करण्यासाठी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालूका अध्यक्ष संजय कुबल, भाजपाचे नेते विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य माजी आमदार कै प्रल्हाद रेमाणी यांचे सुपुत्र जोतिबा रेमाणी, वन नीगमचे राज्य संचालक सुरेश देसाई, सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, ता पं माजी सदस्या वासंती बडीगेर,बसु सानीकोप, राज्य कार्यकारीणी सदस्या धनश्री सरदेसाई, कीरण यळूरकर, मीडिया प्रमुख राजेंद्र रायका, आदिनी परीश्रम घेतले,
वीजय संकल्प रथयात्रेला खानापूर, कीतूर, बैलहोंगल आदि ठिकाणाहून कार्यकर्ते व नागरिकांनी गर्दी केली होती, खानापूरातील कार्यकर्ते व नागरीकांची उपस्थिती जास्त होती,