
खानापूर तालुक्याच्या विकासाचा खरा महापुरूष कार्य सम्राट कै माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांना पाचव्या (पुण्यस्मरण) पुण्यतिथी निमित्त भावपुर्ण आदरांजली,

आमदार म्हणजे काय❓हे खऱ्या अर्थाने खानापूर तालुक्यातील जनतेला कार्य करून दाखवुन दिलेले व्यक्ती म्हणजे कार्य सम्राट कै माजी आमदार प्रल्हाद कल्लाप्पा रेमाणी होय, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही खानापूर तालुक्यातील नावगे गावात एका गरिब कुटुंबातून आलेल्या कै प्रल्हाद रेमाणी यांनी 2008 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून येवुन तालूक्यातील भाजपाचे पहिले आमदार म्हणून मान मिळविला, व योगायोगाने त्याच वर्षी भाजपाचे सरकार स्थापन होवुन बी एस यड्डीयुराप्पा मुख्यमंत्री झाले, आणी खानापूर तालुक्याच्या विकासासाठी याचा पुरेपूर उपयोग त्यांनी करून दिला,

बघता बघता ते मुख्यमंत्री यड्डीयुराप्पा यांचे निकटवर्तीय कधी झाले हे त्यांना समजलेच नाही आणि याचा उपयोग करून तालुक्यासाठी जवळ जवळ 450 कोटी पेक्षा जास्त विकास निधी मिळवून खानापूर तालूक्याचे नंदनवन करून टाकले खानापूर शहरातील श्री मलप्रभा नदिवर बांधण्यात आलेला घाट व नवीन बंधारा वजा पुल त्यांनीच निर्माण केल्याने नदिवर बांधण्यात आलेल्या घाटाला त्यांचेच नाव देण्यात आलेले आहे,
खानापूर शहरात नवीन बांधण्यात आलेले तहसीलदार कचेरी (मीनी विधानसभा) खानापूर शहरात निर्माण करण्यात आलेले मलप्रभा क्रीडांगण त्यांच्याच प्रयत्नाने मंजूर होवुन काम सुरू झाले होते पुढे ते माजी आमदार अरविंद पाटील यांनी पुर्ण केले, तालूक्यातील दुर्गम भागात रस्ते नसलेल्या ठिकाणी रस्ते बनविले, कळसा भांडूरा चे पाणी आडवुन शेतकर्यांना त्याचा पुरेपूर वापर होण्यासाठी मलप्रभा नदिवर पाच बंधारे बांधण्याची योजना होती त्यापैकी तीन बंधारे त्यांनी बांधले, व शेतकरी त्याचा वापर सद्या करत आहेत, बंद पडलेला भाग्यलक्ष्मी साखर कारखाना शेतकर्यांना उपयोग होवुदेत म्हणून पुढाकार घेवून खाजगी कंपनीला लैला शुगरला चालविण्यास दिला,आता तो महालक्ष्मी ग्रुप चालवीत आहे, ते धार्मिक वृतीचे असल्याने तालुक्यातील मठ, मंदिरे यांना भरपूर विकास निधी मिळवून त्याठिकाणी रस्ते,वीज, व ईतर बरीच कामे केली, 22 जानेवारी 2018 रोजी आजाराचे नीमीत होवुन त्यांचे निधन झाले, तीथीप्रमाणे आज 26 जानेवारी 2018 रोजी पाच वर्षे होत असून त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्ष व त्यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य जोतीबा रेमाणी व कुटूंबीय तसेच नावगे ग्रामस्थांच्या वतीने “कै माजी आमदार प्रल्हाद रेमाणी मलप्रभा नदि घाट” याठिकाणी सकाळी 11-00 वाजता 5 वे पुण्यस्मरण (पुण्यतीथी) म्हणून आदरांजली चा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे त्यानिमित्ताने त्यांना भावपुर्ण 💐आदरांजली
