खानापूर तालुक्यातील हेबाळ ग्रामपंचायतच्या पीडीओ आरती अंगडी या मनमानी करत असून सदस्यांना विश्वासात न घेता मर्जीप्रमाणे कामे करत असून त्यांची अन्यत्र बदली करण्यात यावीत असे निवेदन हेब्बाळ ग्रां पं चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व सर्व ग्रां पं च्या सदस्यांनी तालुका पंचायतीच्या ई ओ ना दिले
निवेदनात पुढे म्हटले आहे की आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी डिजिटल लायब्ररीचा उदघाटन सोहळा त्यांनी अध्यक्ष व सर्व सदस्यांना विश्वासात न घेता ठेवला होता व कार्यक्रमाच्या पत्रिकेत अध्यक्षपदी दुसऱ्या गावच्या व्यक्तीचे नाव घातले होते हा एक प्रकारे सर्व सदस्यांचा त्यांनी अपमानच केला आहे, तसेच त्या आपल्या मर्जी प्रमाणे सदस्यांना विश्वासात न घेता कामे करत असुन नागरिकांची कामे हि वेळेवर करत नसुन साध्या कामासाठी तीन चार वेळा पंचायतीला नागरीकांना हेलपाटे मारावे लागतात तसेच वरचेवर गैर हजर असल्याने राष्ट्रीय सण व ईतर कामे सुध्दा त्यांच्या गैरहजेरीत करावी लागतात या अशा त्यांच्या वागण्याला हेब्बाळ ग्रां पं च्या व्यापतीतील नागरीक व सदस्य वैतागले असुन यापुर्वी सुध्दा त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली असुन त्यांच्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही, तेव्हा या निवेदनाची ताबडतोब दखल आपण घ्यावीत व सदर पीडीओंची ताबडतोब बदली करण्यात यावीत अन्यथा ग्राम पंचायतीला टाळे ठोकुन आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनाद्वारे दिला आहे, या निवेदनावर ग्रां पं अध्यक्ष मल्लवा चंद्रु मादार, उपाध्यक्ष रवींद्र बाळाराम सुतार, संजय अनंत पाटील, परशराम यल्लारी घाडी, दिलीप वेंकटेश चन्नेवाडकर,
प्रकाश गोपाळ गुरव, रूपाली, आप्पाजी हडलगेकर, वैष्णवी विष्णू काद्रोळकर, पुष्पा आळवणी,अंकिता संदीप सुतार,
नंदा नागो केसरेकर, शितल मष्णू मडवळकर, गीता गंगाराम कोलकार, यांच्या सह्या आहेत,