
बैलूर ग्राम पंचायत, अध्यक्षांवर अविश्वास ठराव पारित.
खानापूर ; बैलूर ग्राम पंचायत, अध्यक्षांवर अविश्वास ठराव समंत करण्यात आला आहे. त्यामुळे वीद्यमान अध्यक्षांना, अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. बैलूर ग्रा. पं. अध्यक्ष रामलिंग ओमानी मोरे यांच्या विरोधात, आज बुधवार दिनांक 22 जानेवारी रोजी अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. त्यामुळे आज अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले.
यावेळी 16 सदस्यापैकी 11 सदस्यांनी अध्यक्षांच्या विरोधात मतदान केले, तर तिघांनी अध्यक्षांच्या बाजुने मतदान केले. एक सदस्य अनुपस्थित राहिला. तर माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण बामणे यांच्या पत्नीचे नुकताच निधन झाल्याने, त्यांची एक जागा खाली आहे.
खानापूर तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर व स्थानिक राजकारणात पक्ष विरहित राजकारण व निवडणुका होत असतात. बैलूर ग्रामपंचायत अध्यक्ष रामलिंग मोरे यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम केलं नसल्याने, त्यांच्यावर अविश्वास ठराव घालण्यात आला असल्याचे कुसमळीचे सामाजिक कार्यकर्ते आनंत सावंत यांनी सांगितले आहे.
ಬೈಲೂರು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರ ವಿರುದ್ಧ ಅವಿಶ್ವಾಸ ನಿರ್ಣಯ ಅಂಗೀಕಾರ.
ಖಾನಾಪುರ; ಬೈಲೂರು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರ ವಿರುದ್ಧ ಅವಿಶ್ವಾಸ ನಿರ್ಣಯ ಮಂಡಿಸಿದ್ದರಿಂದ, ಹಾಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನದಿಂದ ಕೆಳಗಿಳಿಯಬೇಕಾಯಿತು. ಬೈಲೂರು ಗ್ರಾಮ. ಪಂ. ಜನವರಿ 22 ರ ಬುಧವಾರದಂದು ಅಧ್ಯಕ್ಷ ರಾಮಲಿಂಗ ಓಮನಿ ಮೋರೆ ವಿರುದ್ಧ ಅವಿಶ್ವಾಸ ನಿರ್ಣಯ ಮಂಡಿಸಲಾಯಿತು. ಆದ್ದರಿಂದ, ಇಂದು ಅವಿಶ್ವಾಸ ನಿರ್ಣಯದ ಮೇಲೆ ಮತದಾನ ನಡೆದು
ಈ ಬಾರಿ, 16 ಸದಸ್ಯರಲ್ಲಿ 11 ಸದಸ್ಯರು ಅಧ್ಯಕ್ಷರ ವಿರುದ್ಧ ಮತ ಚಲಾಯಿಸಿದರೆ, ಮೂವರು ಅಧ್ಯಕ್ಷರ ಪರವಾಗಿ ಮತ ಚಲಾಯಿಸಿದರು. ಒಬ್ಬ ಸದಸ್ಯರು ಗೈರುಹಾಜರಾಗಿದ್ದರು. ಒಬ್ಬ ಸದಸ್ಯರು ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದಾರೆ.
