रयत संघटना व खानापूर नागरिक व शेतकरी हितरक्षण संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व एसपी बेळगाव यांना निवेदन..
खानापूर : खानापूर तालुक्यातील रहिवाशांना गणेबैल येथील टोल नाक्यावर टोल शुल्कातून सूट मिळावीत, व शासनाने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केल्या आहेत. त्यांना योग्य तो आर्थिक मोबदला अजून देण्यात आला नाही. तो लवकरात लवकर देण्यात यावात तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी खानापूर येथे घेतलेल्या बैठकीत पंधरा दिवसात जमिनी गेलेल्या, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमिनीचा मोबदला रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते अजून जमा करण्यात आले नाही. ते लवकरात लवकर जमा करावेत अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे रयत संघटनेच्या वतीने, रयत संघटनेचे नेते प्रकाश नायक व खानापूर नागरिक हितरक्षण, व शेतकरी हितरक्षणच्या वतीने पंडित ओगले यांनी जिल्हाधिकारी बेळगाव व एस पी बेळगाव यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्या सोबत व रयत संघटनेचे नेते प्रकाश नायक व खानापूर नागरिक व शेतकरी हितरक्षण चे नेते पंडित ओगले यांच्याबरोबर जवळजवळ अर्धा तास आपल्या दालनात चर्चा केली. त्यानंतर बेळगावचे एसपी श्री संदीप पाटील यांची भेट घेण्यात आली त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व प्रकाश नायक व पंडित ओगले यांच्याशी चर्चा केली. व शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
रयत संघटना व नागरीक व शेतकरी हितरक्षण संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी व एसपीना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की…खानापूर तालुका हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला व अविकसित तालुका असून तालुक्यात अनेक गोरगरीब लोक राहतात आणि रोज अनेक लोक खानापूर तालुक्यातून बेळगावला चरितार्थासाठी ये-जा करतात परंतु गणेबैल येथे टोल शुल्क आकारणी जास्त करण्यात येत आहे. जास्त पटीने टोल वसूल केला जातो. त्यामुळे गणेबैल टोल प्लाझा येथे खानापूर तालुक्यातील रहिवाशांना टोल शुल्क भरण्यापासून सूट देण्याची विनंती.
दुसरे म्हणजे, खानापूर तालुक्यातील शेतकर्यांनी त्यांच्या सुपीक जमिनी गमावल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी शासनाने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. परंतु आजपर्यंत त्यांना जमिनीचा मोबदला दिलेला नाही. अनेक शेतकर्यांनी त्यांच्या उत्पन्नाचा एकमेव स्तोत्र असलेल्या जमिनी देखील गमावल्या आहेत. अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबातील लोकांना टोल प्लाझामध्ये रोजगार देण्यांत यावात.
तसेच यापूर्वीच्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली आहे त्यांना 15 दिवसांत नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी व शासनाने दिले होते, परंतु आजपर्यंत शासनाने त्यांचे आश्वासन पूर्ण केलेले नाही.
त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की, आजपासून 8 (आठ) दिवसांच्या आत वरील समस्यांवर योग्य तो निर्णय घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा रयत संघ (शेतकरी संघटना) आणि खानापूर तालुक्यातील नागरिक व शेतकरी हित रक्षण संघटनेच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल असे निवेदनात लिहिले आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश नायक, तसेच नागरिक व शेतकरी हितरक्षणचे नेते पंडित ओगले, नितीन पाटील, किरण तुडवेकर, कृष्णा बाळेन्नावर, संजय मयेकर, संजय गुरव, भूषण ठोंबरे, पंकज कुट्रे, मारुती सुंठकर, ज्ञानेश्वर देवलतकर, संतोष पाटील, जोतिबा कुपटगिरी, मुकुंद कीतूरकर, गजानन घाडी, तसेच शेतकरी वर्ग व खानापुरातील नागरिक उपस्थित होते.
ರಿಯಾತ್ ಸಂಘ ಮತ್ತು ಖಾನಾಪುರ ನಾಗರಿಕರ ಮತ್ತು ರೈತರ ಕ್ಷೇಮಾಭಿವೃದ್ಧಿ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಹಾಗೂ ಎಸ್ಪಿ ಬೆಳಗಾವಿ ಅವರಿಗೆ ಹೇಳಿಕೆ.
ಖಾನಾಪುರ: ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಗಣೇಬೈಲ್ ಟೋಲ್ ಸಂಗ್ರಹ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ನಾಗರಿಕರು. ಟೋಲ್ ಶುಲ್ಕದಿಂದ ವಿನಾಯಿತಿ, ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹೆದ್ದಾರಿಗಾಗಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸ್ವಾಧೀನಪಡಿಸಿಕೊಂಡಿರುವ ರೈತರ ಭೂಮಿ. ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಅವರಿಗೆ ಸೂಕ್ತ ಆರ್ಥಿಕ ಪರಿಹಾರ ನೀಡಬೇಕು.
ಅಲ್ಲದೇ ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಸಭೆ ನಡೆಸಿದರು. ಆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಜಮೀನು ಕಳೆದುಕೊಂಡ ರೈತರ ಖಾತೆಗೆ 15 ದಿನಗಳಲ್ಲಿ ಆರ್ಥಿಕ ಪರಿಹಾರದ ಮೊತ್ತವನ್ನು ಜಮಾ ಮಾಡುವುದಾಗಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಭರವಸೆ ನೀಡಿದ್ದರು. ಆ ಮೊತ್ತವನ್ನು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಜಮಾ ಮಾಡಬೇಕು. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಆಂದೋಲನದ ನಿಲುವು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗುವುದು. ರಿಯಾತ್ ಸಂಘದ ಮುಖಂಡ ಪ್ರಕಾಶ ನಾಯಕ್, ಪಂಡಿತ್ ಓಗ್ಲೆ ಅವರು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಹಾಗೂ ಎಸ್ಪಿ ಬೆಳಗಾವಿ ಅವರಿಗೆ ಹೇಳಿಕೆ ಮೂಲಕ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ.
ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರಿಯಾತ್ ಸಂಘದ ಮುಖಂಡ ಪ್ರಕಾಶ್ ನಾಯಕ್, ಹಾಗೂ ನಾಗರೀಕ ಮತ್ತು ರೈತ ಕಲ್ಯಾಣ ಸಂಘಟನೆಯ ಮುಖಂಡರಾದ ಪಂಡಿತ್ ಓಗ್ಲೆ, ನಿತಿನ್ ಪಾಟೀಲ್, ಕಿರಣ್ ತುಡ್ವೇಕರ, ಕೃಷ್ಣಾ ಬಾಳೆನ್ನವರ, ಸಂಜಯ ಮಾಯೇಕರ, ಸಂಜಯ ಗುರವ, ಭೂಷಣ ತೋಂಬ್ರೆ, ಪಂಕಜ್ ಕುತ್ರೆ, ಮಾರುತಿ. ಸುಂತ್ಕರ್, ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ದೇವಳಟ್ಕರ್, ಸಂತೋಷ ಪಾಟೀಲ್, ಜೋತಿಬಾ ಕುಪಟಗಿರಿ, ಮುಕುಂದ್.ಕೀತೂರಕರ್, ಗಜಾನನ ಘಾಡಿ, ಹಾಗೂ ಖಾನಾಪುರದ ರೈತರು ಮತ್ತು ನಾಗರಿಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.