राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू.
मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरात राष्ट्रवादी अजित पवार
गटाचे आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन राऊंड गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सिद्दीकी जखमी झाले होते. बाबा सिद्दीकी यांना जवळच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं आहे. गोळीबार कोणी केला याची अद्याप पुष्टी झालेली नाही. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. मुंबईच्या बांद्रा पूर्वेत खैर नगर परिसरात ही घटना घडली आहे. घटनास्थळी निर्मलनगर पोलीस पोहोचले असून, पुढील तपास करीत आहेत.
काही महिन्यांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांच्या मुलावर काँग्रेसने कारवाई केली होती. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हे आमदार असून मुंबई युवक काँग्रेसचं अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती. पण आता काँग्रेसने त्यांना पदावरून हटवलं होतं. वडील बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. अशीही चर्चा आहे की झिशान सिद्दीकी सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहे.
66 वर्षीय बाबा सिद्दीकी एकदा मंत्री तर तीन वेळा वांद्रे पश्चिमचे आमदार राहिले आहेत. त्यांचा मुलगा झीशान हा वांद्रे पूर्वचा आमदार असून, त्यांनी अद्याप काँग्रेस सोडण्याची घोषणा केलेली नाही. ते मुंबई युवक काँग्रेसचे प्रमुख आहेत. बाबा सिद्दीकी चार दशकांहून अधिक काळ काँग्रेसशी संबंधित होते. मूळचे बिहारचे असलेले बाबा सिद्दिकी यांनी 1990 च्या दशकात मुंबईत निवडणुकीचे राजकारण सुरू केले. 1992 मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1997 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. बाबा सिद्दीकी 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये ते पुन्हा विजयी झाले. बाबा सिद्दीकी 2004 ते 2008 या काळात मंत्रीही होते.
बाबा सिद्दीकी हे त्यांच्या बॉलिवूड कनेक्शनसाठी ओळखले जातात. सलमान आणि शाहरुख दोघेही त्याच्या इफ्तार पार्टीत एकत्र आले होते. बाबा सिद्दीकी यांच्या राजकारणातील उदयामागे दिवंगत सुनीत दत्त यांचे योगदान असल्याचे मानले जाते. सुनील दत्त नंतर बाबा सिद्दीकी त्यांचा मुलगा व संजय दत्त आणि मुलगी प्रिया दत्त यांच्या खूप जवळ आहेत. 2017 मध्ये ईडीने बाबा सिद्दीकी यांच्यावर छापा टाकला तेव्हा त्यांनी त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याला पुढे केले होते. 2019 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले.