खानापूर म ए समितीची महत्वपूर्ण बैठक संपन्न.1 नोव्हेंबर रोजी कडकडीत हरताळ पाळण्याचे आवाहन
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी शिवस्मारक खानापूर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते.
सुरवातीला सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक केले आणि बैठकीचा उद्देश सांगितला. त्यानंतर तालुक्यातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली….
1 नोव्हेंबर काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळण्याचे आवाहन खानापूर म. ए. समिती अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे.
केंद्र सरकारने भाषावार प्रांत रचना करून 1 नोव्हेंबर 1956 रोजी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आदी बहुसंख्य मराठी भाषिक प्रदेश अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आल्यामुळे, बहुसंख्य मराठी भाषिकावर अन्याय होत आहे. गेल्या 67 वर्षापासून सीमाभागातील मराठी भाषिक जनतेची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा अद्यापही कायम असून सीमाभागातील मराठी जनता दरवर्षी बेळगावसह सीमाभागात 1 नोव्हेंबर या दिवशी काळा दिन पाळून सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करते. यावर्षी देखील 1 नोव्हेंबर या काळ्या दिनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले. काळ्या दिनी संपूर्ण सीमाभागात कडकडीत हरताळ पळून केंद्र सरकारचा निषेध नोंदवा असे आवाहन समिती नेते गोपाळ पाटील यांनी केले तर राजाराम देसाई म्हणाले की, काळ्या दिनी केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवावेत तसेच सर्व मराठी भाषिकांनी आपल्या मुलांना एक नोव्हेंबर दिवशी शाळेला पाठवू नये असे आवाहन केले.
तसेच खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवारी खानापूरात पत्रकांचे वाटप करून जनजागृती करण्यात आली व काळादिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन करण्यात आले…
यावेळी कार्याध्यक्ष मुरलीधर गणपतराव पाटील, खजिनदार संजीव रामचंद्र पाटील, प्रकाश विठ्ठलराव चव्हाण, बाळासाहेब महादेव शेलार, पांडुरंग सावंत, रमेश देसाई, भीमसेन कल्लाप्पा करंबळकर, जगन्नाथ लक्ष्मण देसाई, राजाराम साताप्पा देसाई, मोहन रामू गुरव, ब्रह्मानंद जोतिबा पाटील, म्हात्रु नारायण धबाले, सुनील मुरारी पाटील, सदानंद राजाराम पाटील, अमृत बडकू पाटील, गंगाराम सहदेव पाटील, रुक्माणा शंकर झुंजवाडकर, पुंडलिक रामचंद्र पाटील, शामराव कल्लोजीराव पाटील, कल्लाप्पा प्रल्हाद कोडचवाडकर, डी. एम. भोसले, रमेश मल्हारी धबाले, ऍड केशव कळ्ळेकर, अजित वसंतराव पाटील, कृष्णा मल्लाप्पा कुंभार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते..