येणाऱ्या एक नोव्हेंबर काळा दिनाची जनजागृती खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर समितीचे अध्यक्ष श्री गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली खानापूर शिवस्मारक येथून एक नोव्हेंबर काळा दिनानिमित्त हरताळ पाळण्याचे आवाहन करणारी पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. खानापूर तालुक्यामधील मराठी बहुभाषिक गावा मध्ये पत्रके वाटून येणाऱ्या दिवसांमध्ये मराठी भाषिकांना एक नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळून केंद्र शासनाचा मराठी भाषिकांनी निषेध करावा. खानापूर म. ए. समितीच्या वतीने लक्ष्मी मंदिर खानापूर येथे स
काळी 11 ते 2 पर्यंत उपोषण केले जाणार आहे. तरी तालुक्यातील मराठी भाषिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी केले. तसेच गेल्या चार पिढ्यापासून रेंगाळत असणारा सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडून केंद्र शासनाने मराठी भाषिकांना न्याय द्यावा व तालुक्यातील सर्व मराठी भाषिकांनी येणारा एक नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पळावा. असे सांगून युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील यांनी खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांना आवाहन केले. यावेळी समितीचे जेष्ठ नेते देवाप्पांना गुरव, पीएच पाटील, सुरेश देसाई, दत्तू कुट्रे, बळीराम पाटील, रवींद्र पाटील राजाराम देसाई, राजू पाटील, तमन्ना रामा नाटके शिरोली, श्रीकांत देसाई शिरोली, मारुती येळूरकर, रवळू जाधव, व प्रकाश भाऊराव पाटील कारलगा, आदी उपस्थित होते.