खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीकडून येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावीत यासाठी समीतीचे युवा नेते माजी आमदार कै निळकंठराव सरदेसाई यांचे पुतणे व सरकार उदयसिंह सरदेसाई यांचे सुपूत्र निरंजन सरदेसाई यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आपला अर्ज दाखल केला,
आज दुपारी आपल्या नीवास्थानाकडून आपले पिताश्री समीतीचे जेष्ठ नेते श्रीमंत सरकार कै उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपल्या समर्थकांसह पदयात्रेने जावुन आपला अर्ज म ए समीतीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्याकडे सादर केला,
यावेळी पदयात्रेत रणजित पाटील हलगा, मुकुंद पाटील शीवोली, नगरसेवक व स्थायी चेअरमन विनोद पाटील, अशोक पाटील नागुर्डा, चापगांव ग्रां पं माजी चेअरमन रमेश धबाले, नागेश भोसले कौंदल, टोपाण्णा कालमणकर, विठ्ठल शीपूकर, वासु कालमणकर, तसेच चापगांव ग्रां पं माजी चेअरमन रमेश धबाले, तसेच कान्सुली, नागुर्डा, नागुर्डा वाडा, विश्रांतवाडी, खानापूर व आदि ठिकाणाहून आलेले पंच मंडळी, जेष्ठ नागरिक, व युवाकार्यक्रते उपस्थित होते,
समितीकडे आपला अर्ज सादर केल्यानंतर बोलताना निरंजन सरदेसाई म्हणाले की युवकांना एकत्र करून समितीच्या मुख्य प्रवाहात आणुन रस्त्यावरील लढाई जिंकुण आपल्याला महाराष्ट्रात जायचे आहे त्यासाठी सर्वानी समितीच्या झेंड्याखाली एकत्र यावेत असे आवाहन त्यांनी केले यावेळी समीतीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, सचीव सीताराम बेडरे, प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, एडवोकेट अरूण सरदेसाई, अर्बन बँकेचे संचालक रवींद्र सरदेसाई, व आदि नेतेमंडळी उपस्थित होते,