
गर्लगुंजी : मराठी माणसांनी एकत्र राहून कार्य केल्यास खानापूर तालुक्यात नक्कीच परिवर्तन घडणार यात तिळमात्र शंका नाही, तसेच सीमाप्रश्नाचा हा लढा कोणा एका व्यक्तीचा नसून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेल्या मराठी माणसांचा असल्याचे रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर महाराष्ट्र चे आमदार नीलेश लंके यांनी गर्लगुंजी गावात समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचार सभेत मांडले,
पुढे बोलताना ते म्हणाले की गर्लगुंजी हे गाव सीमा चळवळीतील व सीमा लढ्यातील क्रांतिकारकांचे गाव म्हणून ओळखले जाते आजपर्यंत समितीच्या प्रत्येक लढ्यात गावातील नागरिकांनी भाग घेवुन सहकार्य केले आहे, तसेच पुन्हा सहकार्य समितीला करून समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना संपुर्ण गावातील नागरिकांनी मतदान करण्याची विनंती उपस्थीत नागरीकांना केली, सभेच्या अध्यक्षस्थानी गर्लगुंजी ग्रां पं चे माजी अध्यक्ष व समितीचे नेते गोपाळराव पाटील होते,
यावेळी समितीचे जेष्ठ नेते माजी आमदार दिगंबरराव पाटील, समितीचे युवा नेते शुभम शेळके, उमेदवार मुरलीधर पाटील गोपाळराव पाटील समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई कार्याध्यक्ष यशवंत बिरजे तालुका पंचायत चे माजी सदस्य पांडुरंग सावंत आदींची सीमा चळवळ सीमा लढा याबद्दल माहिती देणारी भाषणे झाली,

यावेळी गर्लगुंजी गावातील समितीनिष्ठ नागरिक व युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता,



