खानापूर : गोधोळी येथील अपघातात मृत्युमुखी कुटुंबीयांची महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील व नेतेमंडळींनी भेट घेवुन त्यांचे सांत्वन केले,
गोधोळी येथे पिकाला पाणी देवुन घरी चालत वापस येत असताना पुंडलीक लोकाप्पा रेडेकर (77), कृष्णा लोकाप्पा रेडेकर (56) आणि महाबळेश्वर नागेंद्र शिंदे या शेतकऱ्याना भरधाव कारने ठोकरल्याने या तिघांचा मृत्यू झाला,
त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी खानापूर तालुका म.ए. समितीचे अध्यक्ष श्री गोपाळराव बळवंतराव देसाई, म. ए. समितीचे नेते श्री मुरलीधर गणपतराव पाटील, श्री. जगन्नाथ बिरजे, श्री राजाराम देसाई, श्री विठ्ठल नीगाप्पा गुरव, श्री रणजीत कल्लाप्पा पाटील, श्री कृष्णा मन्नोळकर, श्री ब्रम्हानंद पाटील, आदिनी त्यांच्या घरी भेट दिली व सरकार दरबारी प्रयत्न करून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले,