
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री मुरलीधर गणपतराव पाटील यांना खानापूर तालुक्यातील सर्व स्तरातून भरघोस पाठींबा मिळत असून आज त्यांच्या प्रचारफेरीचे खानापूर तालुक्यातील जटगे गावात आगमन झाले, यावेळी जटगे ग्रामस्थांच्या वतीने श्री मुरलीधर पाटील यांच्यासह उपस्थित सर्व समिती पदाधिकाऱ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले,
यानंतर प्रचारफेरीचे रूपांतर एक छोटेखानी सभेमध्ये झाले, यावेळी श्री मुरलीधर पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मराठी भाषिकांवरील होणाऱ्या अन्यायाविरूद्ध आवाज उठविण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीला प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले त्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व गावकऱ्यांनी श्री मुरलीधर पाटलांना मतदान करून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीला प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचा निर्धार केला यावेळी श्री मुरलीधर पाटील यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते,
