एक नोव्हेंबर काळा दिनानिमित्त खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज खानापूर समितीचे अध्यक्ष श्री गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मी मंदिर खानापूर येथे लाक्षणिक उपोषण व सभा घेण्यात आली या सभेमध्ये मराठी भाषिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना केंद्र शासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला एक नोव्हेंबर काळा दिनानिमित्त गेल्या पंधरा दिवसापासून समितीच्या कार्यकर्त्यांनी तालुक्याच्या मराठी भाषिक गावांमध्ये मोठ्या दमाने जनजागृती करण्यात आली
होती यामुळे केंद्र शासनाचा निषेध करून आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील तरुण मंडळी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी समितीच्या नेत्यांनी केंद्र शासनाचा निषेध करताना यापुढेही मोठ्या उत्साहाने व लढाई बाणाने रस्त्यावरची लढाई लढली जाईल असे सांगून तरुण मराठी भाषिकांच्या मध्ये उत्साह निर्माण होणारी भाषणे केली यावेळी खानापूर समितीचे अध्यक्ष श्री गोपाळराव देसाई यांनी अध्यक्ष भाषणामध्ये केंद्र शासनाचा निषेध करून सीमा प्रश्नाचा निकाल येईपर्यंत मराठी भाषिक आणि एक संग राहून होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडली पाहिजे यावेळी समितीचे ज्येष्ठ नेते देवाप्पांना गुरव, गोपाळराव पाटील, माजी सभापती सुरेश राव देसाई, संभाजी देसाई, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, सूर्याजी पाटील बळीराम पाटील, पी एच पाटील, रवींद्र शिंदे, रवींद्र पाटील, पांडुरंग सावंत, युवा समितीचे कार्याध्यक्ष किरण पाटील, विनायक सावंत, विजय मादार, रणजीत पाटील, राजू पाटील, निरंजन सरदेसाई, दत्तू कुटरे, तुकाराम कुलम, आणि तुकाराम गावडे, गजानन पाटील, भास्कर पाटील, अरुण नलावडे, किरण देसाई, महादेव बाचोळकर, ज्ञानेश्वर ताशीलदार, गंगाधर गुरव, कल्लाप्पा करंबळकर, नागराज हलगेकर, शिवा सुतार, पंकज ज्ञानेश्वर चिकदिनकोप ओमकार ताशीलदार, समर्थ हलगेकर, ओमकार शहापूरकर, भुजंग देगावकर, संतोष पुनगे, सतीश पाटील, महादेव करवीनकोप,राहुल झुंजवाडकर, तसेच तीओली नंदगड शिरोली गर्लगुंजी खानापूर हलसाल अशा बर्याच मराठी भाषीक गावांमधून तरुण व ज्येष्ठ नागरिक हजर होते,