खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर तालुक्यामधील मराठी बहुभाषिक असलेल्या गावांमध्ये एक नोव्हेंबर काळा दिनानिमित्त पत्रके वाटून मराठी भाषिकांच्या मध्ये जनजागृती करण्याची मोहीम गेल्या काही दिवसापासून हाती घेण्यात आली आहे आज शुक्रवार रोजी शिरोली तीओली हेमडगा भागातील गावामध्ये खानापूर म ए समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिक नागरिकांची भेट घेऊन येणाऱ्या एक नोव्हेंबर काळा दिन रोजी गांभीर्याने कडकडीत हरताळ पाळावे तसेच खानापूर येथील लक्ष्मी मंदिर येथे अकरा ते दोन या वेळेत उपोषण व सभा आयोजित केली आहे यामध्ये मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवून केंद्र शासनाने मराठी भाषिकवर केलेल्या अन्यायाचा विरोध करून निषेध करावा असे आवाहन करण्यात आले यावेळी समितीचे कृष्णा गुरव राजाराम गावडे हेमडगा नागप्पा देसाई गणपती मटके कल्लाप्पा नांद्रे कर विष्णू सुतार मारुती गावकर मारुती तळेवाडकर यल्लाप्पा पाटील वासु विजय मादर रामा कालमनकर असे जामगाव हेमडगा शिरोली भागातील नागरिक उपस्थित होते