खानापूर ज्ञानेश्वर मंदिर येथे कर्नाटक राज्य जेष्ठ नागरिक असोसिएशन खानापूर तालुका युनिट च्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी अपोलो फार्मसी मेडिकल स्टोअर्सच्या सहकार्याने मोफत ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, आणि वजन तपासणी करण्यात आली कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी संघटनेचे तालूका अध्यक्ष व्ही एम बनोशी सर होते, कार्यक्रमाची सुरूवात ह भ पं मोहण पाटील यांच्या हस्ते गणेश पुजन करून करण्यात आली,
गरजू लोकांना आवश्यकतेनुसार सल्ला देण्यात आला तसेच कमी दरात काही औषधेही देण्यात आली सुमारे 64 नागरिकांनी याचा लाभ घेतला यावेळी अपोलो फार्मसी च्या पाच व्यक्तींचा संघटनेचे अध्यक्ष व्हीएम बनोशी सर यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला संघटनेच्या कार्याचा संपूर्ण अहवाल श्री टी वाय पाटील गुरुजींनी सादर केला येत्या 25 नोव्हेंबर रोजी संघटनेच्या 30 सभासदांनी दक्षिण भारताच्या सहलीला जाण्याचे ठरले समारंभाचे प्रमुख पाहुणे श्री लक्ष्मण दत्ताजी पाटील सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांनी रासायनिक खते वापरून काढलेल्या पिकामुळे कसे व कोणते आजार होतात ते टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात कोणत्या उपाययोजना करून नैसर्गिक शेती करून उत्पन्न घेणे बाबत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले यावेळी हेबाळकर गुरुजी व संघटनेचे अध्यक्ष व्ही एम बनोशी सर यांची भाषणे झाली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सेक्रेटरी श्री सी एस पवार सरांनी केले तर आभार प्रदर्शन टी वाय पाटील गुरुजी यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री उमाकांत वाघधरे रामचंद्र सावंत खजिनदार, तसेच जीगजीनी सर यांचे सहकार्य लाभले,