
बेळगाव – बेळगाव महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 6 फेब्रुवारी 2023 ही निश्चित झाली आहे. यासंदर्भात प्रादेशिक आयुक्त डॉ . महांतेश हिरेमठ यांनी माहिती दिली आहे .
बेळगाव महानगर पालिकेची निवडणूक पार पडून तब्बल जवळपास सव्वा वर्ष उलटले आहे मात्र महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा मुहूर्त काही सापडत नव्हता . यासंदर्भात शहरातील आमदारांनी देखील दोन वेळा निवडणूक होणार असल्याचे सांगितले होते.31 जानेवारीला ही निवडणूक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.मात्र आता ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून,ती आता 6 फेब्रुवारीला निश्चित करण्यात आल्याचे प्रादेशिक आयुक्त डॉ . महांतेश हिरेमठ यांनी कळवले आहे.
महापौर पदासाठी सामान्य महिला तसेच उपमहापौर पदासाठी ओबीसी महिला असे आरक्षण यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक आयुक्तांनी सांगितले आहे .
