बरगांव खानापूर येथील माइल स्टोन ग्रुप आणि शांती निकेतन पब्लिक स्कूलच्या सहकार्याने 1600 मीटर धावण्याची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्याचे उदघाटन भाजपा युवा नेते पंडित ओगले यांच्या हस्ते करण्यात आले,
सदर स्पर्धा स्थानिक विद्यार्थी व तरुण-तरुणींना वाव मिळावा म्हणून 17 ते 23 वर्षे वयोगटातील मुलांसाठी या जिल्हा मर्यादित धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शांतीनिकेतन शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेत कु संतोष मुडगोळ याने प्रथम क्रमांक, ओमकार शटूप्पा पाटील यांने द्वितीय क्रमांक, जय किल्लेकर याने तृतीय क्रमांक, जोतिबा गोरल याने चतुर्थ क्रमांक, आणि जोतिबा बेळगावकर यांनी पाचवा क्रमांक, पटकाविला बक्षीस वितरण कार्यक्रम ही भाजपा युवा नेते पंडित ओगले व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी परशराम पाटील श्री संतोष देवलतकर माजी सैनिक, श्री जगदीश शिंदे श्री सुधीर दळवी कुमार ओमकार गावडे , कु राहुल गुरव, श्री प्रशांत पाटील, दिगंबर वागळेकर, श्री शंकर हाडीलगेकर, हे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते सुनील पारीषवाडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नन्हे मुजावर यांनी केले यावेळी सर्व मान्यवरांना वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची रोपे देऊन त्यांना गौरविण्यात आले.