
विश्वभारती कला क्रीडा फाऊंडेशन बेळगांव उप शाखा खानापूर यांच्या वतीने नंदगड येथे रविवार दि 26 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 9-00 वाजता महात्मा गांधी हायस्कूल क्रीडांगण येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत,
या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूना मोफत प्रवेश असुन खेळाडूंनी स्वताच्या जबाबदारी वर भाग घ्यावा असे कळविण्यात आले आहे, विज्ञानाच्या युगामध्ये सर्वांचे व्यायामाकडे दुर्लक्ष झाले आसून शिक्षणा बरोबर व्यायामा ची आवड निर्माण व्हावी योगासने करावीत मुलांमधील सर्व कला गुणांचा विकास झाला पाहिजे हा यामागील उद्देश असुन ही स्पर्धा चार गटात होणार आहे,
पहिली ते चौथी 200 मीटर,
पाचवी ते सातवी 400 मीटर,
आठवी ते दहावी 800 मीटर,
खुला गट 1500 मीटर, या चार गटात स्पर्धा घेण्यात येणार आहे, तर
जेष्ठ नागरिकासाठी 1000 मीटर मँरेथॉन स्पर्धा ठेवण्यात आली आहे, या स्पर्धेत विद्यार्थी, विद्यार्थीनी, महिला व नागरिक यांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन हि स्पर्धा यशस्वी करावीत असे आवाहन आयोजकांनी केले आहे,
या स्पर्धा महात्मा गांधी हायस्कूल क्रीडांगण नंदगड येथे सकाळी 9-00 वाजता सुरु होणार आहेत, या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत नंदगड, संत मेलगे मराठी शाळा नंदगड, आणि आनंदगड प्रतिष्ठान पुणे, यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे,
