
तालुक्यातील मराठी शाळां मधील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे.
मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी
यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असून खानापूर
तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठी भाषिकानी मराठी शाळांचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे पदाधिकारी रणजीत पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने बुधवारी खानापूर तालुक्यातील गर्बेनट्टी, खैरवाड, बेकवाड, जुंजवाड, कोणकीकोप, बिडी, तावरकट्टी, गोदगेरी आदी भागातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी शैक्षणिक साहित्य वितरण करीत असताना विविध शाळांमधील शाळा सुधारणा कमिटी व शिक्षकांची भेट घेऊन शाळांमध्ये किती विद्यार्थी आहेत. तसेच शिक्षकांची संख्या किती आहे याबाबतची माहिती जाणून घेण्यात आली. तसेच खानापूर तालुक्यातील मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कशा प्रकारे वाढवता येईल याबाबत चर्चा करण्यात आली.
मिलिंद देसाई यांनी युवा समितीतर्फ गेल्या आठ वर्षांपासून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात येत आहे त्याचा अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना चांगला लाभ होत असून मराठी भाषिकानी इतर माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवता मातृभाषेतून शिक्षण घेण्यास आपल्या पाल्यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे असे सांगितले. समितीचे कार्यकर्ते सुनील पाटील, रुकमान्ना झुंजवाडकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी एम आर बादरे, के एम जाधव, ए आर जेटगी, जी एन बावकर एस एस मंडोळकर, ए आर जोशी एम आर तोटापुर, व्ही व्ही देसाई, पी बी मंडोळकर, निवेदिता मुचंडी, आर के देशपाईक, एम के पाटील, पुंडलिक धबाले, बी बी जाधव, ए बी पाटील, एम जी बेपारी, बी एम मादार, के एन कानेकर, एस एस अम्रपन्नावर, आय ए इनामदार, एस पी गुरव आदि शिक्षक उपस्थीत होते.
