स्वर्गीय श्रीमंत उदयसिंह दत्ताजीराव सरदेसाई यांचा अमृत महोत्सवी जन्मदिनाचे औचित्य साधुन मी मराठी आम्ही मराठी चळवळ जागृत ठेवण्यासाठी मराठी भाषिकांचा पालक मेळावा उद्या रविवार दिनांक 19 मार्च 2023 रोजी सकाळी ठीक दहा वाजता शुभम गार्डन जांबोटी रस्ता या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध शिवव्याख्याते व राजामाता जिजाऊ माँसाहेबांचे थेट वंशज श्री नामदेवराव जाधव पुणे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती या मेळाव्याचे आयोजक कै उदयसिंहराव सरदेसाई यांचे सुपुत्र व मेळाव्याचे स्वागताध्यक्ष श्री निरंजन सरदेसाई म ए समितीचे युवा नेते यांनी राजा श्री शिवछत्रपती शिवस्मारक ट्रस्ट याठीकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली, मेळाव्याला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेतेमंडळीही उपस्थित राहणार असून यात सीमा सत्याग्रहींचाही सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले,
सुरूवातीला सर्वांचे स्वागत मेळाव्याचे पदाधिकारी रमेश धबाले माजी अध्यक्ष चापगाव ग्रां पं यांनी केल्यानंतर पत्रकार परिषदेला सुरूवात झाली,
पुढे माहिती देताना निरंजन सरदेसाई म्हणाले की सदर मेळावा कुठल्याही राजकीय हेतूने आयोजित केलेला नसून फक्त मराठी अस्मितेसाठी मराठी भाषा संवर्धनासाठी आयोजित केलेला असून बरेच विद्यार्थी सध्या आत्महत्या करत असून त्यापासून त्यांना परावर्तित करण्यासाठी त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तालुक्यात दहावीच्या वर्गात पहिला क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व तालुक्यात क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व अतिदुर्गम भागात जाण्या येण्यासाठी रस्ता नसलेल्या ठिकाणी शिक्षक म्हणून नोकरी करून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केलेल्या शिक्षकांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे हा समारंभ बाळेवाडी मठाचे मठाधीश पिर सिंगनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात होणार असल्याचे त्यांनी सांगितले,
खानापूर तालुक्याच्या विकासासाठी शिक्षणासाठी व संबंधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कै माजी आमदार निळकंठराव सरदेसाई व कै उदयसिंह सरदेसाई यांच्या विचारधारेतून खानापूर तालुक्यातील विविध प्रश्ना संदर्भात पालक व शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी जनप्रबोधन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, मराठी भाषा संवर्धन खानापूर तालुक्यातील मराठी शाळा टिकविण्यासाठी तेथील समस्या निवारणासाठी तसेच शिक्षकांची कमतरता दूर करण्याबरोबरच गुणवत्ता पूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करणे व युवकांच्या आत्महत्या रोखणे तसेच व्यसनाधीनतेबाबत पालकांची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन व चर्चा यामध्ये अभिप्रेत असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला एकूण 28 संघ संस्था व शैक्षणिक संस्था यांच्या सहकार्याने हा मेळावा आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले,
यावेळी मेळावा कमिटीचे सदस्य रमेश धबाले, मुकुंदराव पाटील सामाजिक कार्यकर्ते शिवोली, नगरसेवक विनोद पाटील,समिती कार्यकर्ते सदानंद पाटील, कौंदलचे सामाजिक कार्यकर्ते नागेश भोसले अभिजीत सरदेसाई, मणतुर्गे गावचे प्रल्हाद मादार, व ईश्वर बोभाटे, यशोधन सरदेसाई, जय भातकांडे आधी जण उपस्थित होते