
शहरातील मराठा मंडळ संस्थेच्या 92 व्या स्थापना दिनानिमित्त संस्थेच्या विविध विभागांतर्फे संयुक्तरित्या आयोजित रक्तदान शिबिर आज मंगळवारी उस्फुर्त प्रतिसादात पार पडले.

मराठा मंडळ संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ ओरल पॅथॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी, डिपार्टमेंट ऑफ ओरल सर्जरी, एनएसएस युनिट आणि युथ रेड क्रॉस विंग यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महावीर ब्लड बँकच्या सहकार्याने आयोजित या शिबिराच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मराठा मंडळ संस्थेचे माजी उपाध्यक्ष आणि मराठा मंडळ नाथाजीराव जी. हलगेकर इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स अँड रिसर्च सेंटरच्या संचालक मंडळाचे सदस्य एल. बी. सैनूचे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी डॉ. यलबुर्गी यांनी आपल्या समयोचित भाषणात रक्तदानाचे महत्त्व विशद केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. रमाकांत नायक, उपप्राचार्य डॉ. प्रीती कुसुगळ, डॉ. यलबुर्गी, ओरल पॅथॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी कोट्टरशेट्टी, ओरल सर्जरी विभागाचे प्रमुख डाॅ. तुषार बी. वायआरसी इन्चार्ज डॉ. उमेश भोसले, डॉ. रम्या पै, वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे सहकारी, तसेच वायआरसी विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते. डॉ. दीपा काटगाळकर यांनी सर्वांचे आभार मानले. सदर रक्तदान शिबिरात 63 जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून शिबिर यशस्वी केले.
