
बेळगाव : प्रतिनिधी
शैक्षणि आणि सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल येथील मराठा मंडळ या नामांकित शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांना आंतरराष्ट्रीय सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटीतर्फे शनिवारी (ता.१७) गोव्यात आयोजित पदवीदान समारंभात मानद डॉक्टरेट देऊन गौरविण्यात आले.
गोव्यातील कंट्री इनन कांदोलियम गोवा हॉटेलच्या सभागृहात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याहस्ते देऊन गौरविण्यात आले. युनिव्हर्सिटीचे उपकुलगुरू डॉक्टर सेबास्टीन मेंडीस, फादर अॅलेन नोरोहा, डॉ कल्यान चक्रवर्ती, गेरिशम वाकोळे, विधानपरिषद सदस्य नागराजू यादवसह मराठा मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मराठा मंडळ शिक्षण संस्था अग्रगण्य संस्था आहे. बहुजनासह सर्व वर्गासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करण्यासाठी स्थापना करण्यात आली. या संस्थेने शिक्षण क्षेत्रात वेगळा ठसा उमटवण्यात यशस्वी ठरले. मराठा मंडळ आभियांत्रिकी विद्यालय, नाथाजीराव हलगेकर दंत महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालये, पॉलिटेक्निक महाविद्यालयासह विविध शाळा, पदवीपूर्व महाविद्यालये व पदवी महाविद्यालयांची स्थापना करून शिक्षण संस्थेची प्रगती साधली आहे. येथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून, या शिक्षण संस्थेची व्यवस्थापकीय धुरा कै. श्री नाथाजीराव हलगेकर यांच्या निधनानंतर सौ. राजश्री नागराजू यादव (हलगेकर) यांनी सन २००५ पासून समर्थपणे सांभाळली आहे. खंबीर नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने शैक्षणिक कार्याबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रमात भरीव योगदान दिले आहे. माजी मुख्यमंत्री सिध्दराय्या यांच्याहस्ते वीरराणी चन्नम्मा पुरस्काराने सौ राजश्री यांचा गौरव करण्यात आला आहे. राजश्री यादव यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून एचआयव्ही-एड्स जनजागृती, शिक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी ‘शिका व शिकवा उपक्रम’, भ्रष्टाचार निर्मूलन, मलाही जगू द्या, स्त्रीभ्रूण हत्येचा ज्वलंत प्रश्न, सनासुदीनिमित्त झालेली गैरसोय व्यक्त करणारा ‘गणपती बाप्पा बुध्दी द्या,’ आदी विधायक उपक्रमाद्वारे प्रबोधन केले. शिक्षणासह सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमांच्या आयोजनात राजश्री नागराजू यांचे योगदान व मार्गदर्शन अत्यंत मोलाचे आहे. महिलांची सुरक्षा, त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द असलेल्या राजश्री यांनी महिलांचा बुलंद आवाज ठरल्या आहेत. दिल्लीत ‘निर्भया’ घटनेनंतर संस्थेच्या महाविद्यालयात निर्भया कक्ष सुरु केला.
मराठा मंडळ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मदतीने सॅनिटायझर पॅड निर्मिती करून मोफत वितरण करतानाच स्वावलंबी शिक्षणाचे धडे दिले. कोविड महामारीत अन्नदान सेवा केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटीतर्फे राजश्री नागराजू यादव यांना मानद डॉक्टरेट पदवी मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात आली आहे.
