आनंदवाडी, बेळगाव येथील लेडी लायन्स ग्रुपच्यावतीने ” स्वावलंबी भारत ” अभियान उपक्रमांतर्गत महिलांना लघु उद्योग-व्यवसायासाठी मार्गदर्शन देण्यात आले.
सरकार मार्फत राष्ट्रीयीकृत बँकांतर्फे लघु उद्योग-व्यवसायासाठी विविध कर्ज कसे घेता येते त्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
यावेळी महिला उद्योगी व लघुउद्योग भारतीचे राज्य सचिव श्रीमती प्रिया पुराणिक यांनी, महिलांनी विविध उद्योग कसे आणि कुठे सुरु करावेत याबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालयातर्फे श्रीमती कीर्ती हसावदे व रमेश पाटील यांनी बँकेर्फे महिलांना कोणते कर्ज उद्योगासाठी मिळेल याबद्दल माहिती दिली.
यानंतर नॅशनल फेडरेशन ऑफ इंडिया वूमन च्या राज्य सचिव प्रमोदा हजारे यांनी, महिलांनी घरी राहूनही उद्योजक बनून देशाच्या विकासाला कशाप्रकारे हातभार लावू शकतात, याबद्दल विचार मांडले.
लेडी लायन्स ग्रुपच्या संस्थापिका समाजसेविका माधुरी जाधव- पाटील यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते. प्रास्ताविक श्रीमती आरती निपाणीकर यांनी केले.