खानापूर येथील मलप्रभा नदिवर काल फळ्या (पत्रे) घालून पाणी आडवीण्यात आल्याने खानापूर शहरवासीयांच्या पाण्याची सोय झाली पण पाणी आडवीण्यात आल्याने नदि पुलाच्या पलीकडील गावाना पाणी पुरवठा प्रतीवर्षीप्रमाणे अल्प प्रमाणात जात आहे पण नगरपंचायतीने खानापूर शहरातील गटारचे घाण पाणी नदीत सोडल्याने आज कुपटगीरी गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्यांना गटार मिश्रित काळा रंगाचे घाण पाणी आल्याने कुपटगिरी ग्रामस्थांच्या आरोग्याचा जीवन मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे
त्यासाठी ताबडतोब खानापूर नगरपंचायतीने व नगरसेवकांनी हालचाल करून खानापूर शहरातील गटारचे घाण पाणी मलप्रभा नदीत सोडण्यात आले आहे ते ताबडतोब बंद करण्यात यावेत अन्यथा जिल्हाधिकारी बेळगाव यांना घेराव घालण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे, कुपटगिरी गावातील सामाजिक कार्यकर्ते जोतिबा पाटील यांनी आज आपल्या गावातील पाण्याच्या टाक्याना जे घाण पाणी पुरवठा करण्यात आला त्याचा व्हिडिओ त्यांनी आपलं खानापूर ला पाठवला आहे तो बातमी सोबत जोडला आहे