खानापूर येथील नवीन बांधकाम करण्यात येत असलेल्या बस डेपोच्या नवीन इमारतीसाठी अगदि निकृष्ट दर्जाच्या वीटा वापरण्यात येत असुन खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, उदय भोसले, व पदाधिकारी यांनी आज बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन पहाणी केली असता अगदि हातात धरले तरी विरघळुन जाणार्या फुसक्या वीटा वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले
असता त्यांनी संबधित कामगार व सुपरवायझर ला चांगल्या वीटा आणुन बांधकाम कर अन्यथा असे बांधकाम केलास तर जनतेच्या सहकार्याने बांधकाम पाडवीण्यात येईल अशी ताकीद दिली, तरी कृपया या गोष्टीची संबधीतानी चौकशी करून ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावीत अशी तालुक्यातील जनतेतुन मागणी होत आहे, तसेच रामगुरवाडी गावाला जाणारा रस्ता सुध्दा लाखो रूपये खर्चुन नवीन करण्यात आला पण दोन महिन्यात सगळा डांबर खरडून जावुन खड्डे पडले आहेत या बाबत अनेकानी व ग्रामस्थांनी आवाज उठविला असता चौकशी सुरू आहे असे सांगण्यात आले पण चौकशी झाली काय नाही ते अजुन कोणालाच माहित नाही, यात काय गौडबंगाल आहे समजत नाही,