
बेळगाव शहर ,परिसर व तालुका कृषीप्रधान असल्यामुळे शहराच्या मध्यवर्तीय भागात छत्रपती शिवाजी उद्याना नजीक असलेल्या शहापूर बँक ऑफ इंडिया समोरील चौकाचे “किसान चौक” असे नामकरण करण्यात यावेत अशी मागणी शेतकरी नेते राजू मर्वे यांनी शेतकरी बांधवांच्या वतीने केली आहे
देशातील आणि कर्नाटकातील प्रत्येक राजकारण शेतकऱ्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही निवडणुका आल्या की प्रत्येक जाहीरनाम्यात शेतकऱ्या संदर्भातील मुद्दा ठरलेला असतो ही वस्तुस्थिती असताना दुर्दैवाने याच शेतकऱ्यांच्या नावे प्रत्येक शहरात एखादा चौक असावा असे एकाही राजकारणाला वाटत नाही शेतकरी कुळात जन्म घेऊन मोठे झाल्यावर ही एखाद्या राजकीय नेत्यांनी कधी आपल्या कर्तबगारिवर आपल्याच मतदारसंघात किंवा इतर ठिकाणी किसान चौक केल्याचं वृत्त कुठेच ऐकीवात नाही असे असेल तर ते विरळच असे शेतकरी नेते राजू मर्वे म्हणतात बेळगाव शहर परिसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत, त्यांचा आत्म सन्मान वाढविण्यासाठी सरकारने अथवा बेळगावचे स्थानिक लोकप्रतिनिधींनी एखाद्या चौकाचे किसान चौक असे नामकरण करणे क्रमप्राप्त होतं, असे नामकरण व्हावं म्हणून शेतकऱ्यांनी अथवा शेतकरी संघटनांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते यावरून सरकारला शेतकऱ्या बद्दल किती आत्मीयता आहे ते कळून येते तेव्हा शेतकऱ्याप्रती आत्मीयता दाखवत सरकारने शहरातील छत्रपती शिवाजी उद्यान जवळील शहापूर बँक ऑफ इंडिया समोरील चौकाला किसान चौक असे नामकरण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावात
कारण अशा नामकरणामुळे ठराविक एखाद्याचा गौरव होणार नाही तर देशातील प्रत्येक अन्नदात्या शेतकऱ्याचा गौरव होईल असे नमूद करून सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी याचा गांभीर्याने विचार करावा आणि सदर चौकात कींवा मधोमध किंवा बाजूला आकर्षक लक्षवेधी नांगरधारी अथवा बैल जोडीसह शेतकऱ्यांचे सुंदर असे शिल्प उभारून किसान चौक असे नामकरण करावेत अशी मागणी रयत गल्ली वडगाव येथील शेतकरी नेते राजू मरवे यांनी केली आहे
