खानापूर तालुक्याच्या ईतिहासात आजपर्यंत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने वर्चस्व राखलेले असून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंग्रेसचे बसाप्पान्ना अरगावी हे तालुक्याचे पहीले आमदार म्हणून निवडून आले होते, त्यानंतर सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी स्थापन झालेल्या म ए समितीने वर्चस्व राखलेले असुन केवळ दोन वेळचा अपवाद वगळता भाजपचे माजी आमदार कै प्रल्हाद रेमाणी व कॉंग्रेसच्या विद्यमान आमदार डॉ अंजलीताई निंबाळकर यांचा अपवाद वगळता म ए समितीने वर्चस्व राखलेले आहे, समितीचे पहिले आमदार म्हणून निवडून येण्याचा मान कै एल बी बिरजे गुरुजी यांना मिळाला त्या नंतर कै निळकंठराव सरदेसाई तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले, कै वसंतराव पाटील दोन वेळा आमदार झाले, कै व्ही वाय चव्हाण साहेब एक वेळ आमदार तर कै अशोकराव पाटील दोन वेळा आमदार तर श्री दिगंबरराव पाटील व श्री अरविंदराव पाटील हे दोघे प्रत्येकी एक वेळ आमदार म्हणून म ए समितीच्या नावावर आमदारकी भुषवीलेले आहेत, पण सद्या म ए समितीमध्ये दोन गट निर्माण झाल्याने एकी ऐवजी बेकी निर्माण झाल्याने राष्ट्रीय पक्षाचा विजय झाला आहे हे तालुक्यातील प्रत्येक सामान्य समीतीनीष्ट कार्यकर्त्यांना, नेतेमंडळींना,व सामान्य जनतेला माहित आहे, पण असे असताना अजूनही दोन्ही म ए समितीच्या नेते मंडळींनी या गोष्टीचा बोध घेतलेला दिसून येत नाही, एकमेकावर आरोप प्रत्यारोप सुरूच असुन दोन्ही समीत्या 1 नोव्हेंबर काळा दिनानिमित्त वेगवेगळ्या जागृती फेरी काढत आहेत मध्यंतरी दोन्ही समितीत एकी करण्याचा प्रयत्न झाला व एकीही करण्यात आली व तसे जाहिरही करण्यात आले पण अजूनही दोन्ही समितीचे नेतेमंडळी व कार्यकर्ते एकत्र आलेले नाहीत याचा फटका निश्चीतच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून येईल असे दिसते, सध्या खानापूर तालुक्यात म ए समितीतर्फे निवडणूक लढविण्यासाठी श्री गोपाळराव मुरारी पाटील गर्लगुंजी, बाळासाहेब शेलार मणतुर्गे, माजी सभापती सुरेशराव देसाई तोप्पीनकट्टी, पी एल डी बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील जळगे, तसेच राष्ट्रपती पदक विजेते गुरूजी श्री आबासाहेब दळवी गुरूजी मणतुर्गे, श्री गोपाळराव देसाई तीओली, अँड अरूण सरदेसाई, तसेच युवा नेतृत्व म्हणून युवा म ए समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील व युवा नेतृत्व म्हणून कै निळकंठराव सरदेसाईंचे पुतणे श्रीमंत सरकार कै उदयसिंह सरदेसाई यांचे पुत्र निरंजनसींह सरदेसाई यांच्या नावाची चर्चा तालुक्यातील कार्यकर्त्यात सुरू आहे, एैनवेळी सर्वाना सामावुन घेणारे सर्वमान्य म्हणून दिगंबरराव पाटील यांचेही नाव पुढे येण्याची शक्यता आहे असे सर्व सामान्य जनतेत चर्चिले जात आहे,
तालुक्यातील एकनीष्ट समीतीनीष्ट काही कार्यकर्त्यांना व जानकार नेतेमंडळीना “आपलं खानापूर” ने संपर्क साधून विचारले असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आजुन वेळ गेलेली नाही सर्वानी एकत्र मार्ग काढावेत अन्यथा एकी एैवजी बेकी राहिल्यास याचा फायदा निश्चीतच राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना होणार असल्याचे बोलुन दाखविले आहे
टिप पुढील भाग (विधानसभा) भाजपा पक्षाची सद्य स्थिती यावर राहील