पिरणवाडी बेळगाव येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी झालेल्या दुसऱ्या ओपन कराटे चॅम्पियनशिप मध्ये जवळजवळ 300 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता त्यामध्ये खानापूर कराटे अकादमीच्या पाच खेळाडूंनी भाग घेऊन यश संपादन केले
निहिरा परशराम जाधव गोल्ड मेडल आश्विन विष्णू पाटील गोल्ड मेडल क्रिस्टल संदीप सोज सिल्वर मेडल, साक्षी प्रमोद नाईक सिल्वर मेडल, महेश मोहन नाडगौडा सिल्व्हर मेडल मिळवुन घवघवीत यश संपादन केले, या खेळाडूना प्रशिक्षक राहुल पाटील बेकवाड यांचे मार्गदर्शन लाभत असून त्यांच्या देखरेखी खाली सदर स्पर्धक मंगिरीश हॉल या ठिकाणी सराव करत आहेत या अकादमीसाठी सुभाष देशपांडे शिवशंकर कटीमनी परशुराम जाधव विष्णू पाटील संदीप सर प्रदीप नाईक महेश नाडगौडा, देवानंद घाडी सचिन कुंभार मंजुनाथ संगमनावर सोमनाथ पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे,
सदर प्रशिक्षक मंगीरीश हॉल या ठिकाणी सदर विद्यार्थ्यांना अल्प मोबदल्यात प्रशिक्षण देत असून ज्यांना कराटे शिकायचे असेल त्यांनी अल्पशा फी मध्ये ऍडमिशन घ्यावेत असे आव्हान केले आहे