खानापूर तालुक्यातील प्रसिद्ध अशी कणकुंबी माऊली यात्रा बारा वर्षातून एकदा भरत असते त्याठिकाणी चीगुळे,कोदाळी, आणी कणकुंबी माऊली देवी एकत्र येतात व त्या तीघींची भेट होते,पण दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने यात्रा भरवण्यात आली नाही त्या वेळीच दोन वर्षे यात्रा पुढे ढकलण्यात आली होती, ती यात्रा आता 7 फेब्रुवारी 2023 रोजी भरवण्याची यात्रा कमिटीने ठरवले असुन त्या संदर्भात पुर्व तयारी म्हणून चीगुळे गावातील समस्या व यात्रे संदर्भात अडीअडचणी जानुन भाजपा कर्नाटक सरकार कडून सरकार दरबारी प्रयत्न करून मदत मिळवून देण्यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी व तालुका अध्यक्ष संजय कुबल यांनी चीगुळे गावात भेट देवुन ग्रामस्थांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या व ग्रामस्थांसह चीगुळे माऊली मंदिराला भेट दिली, व लवकरच पालक मंत्र्याची भेट घेऊन यात्रेसाठी जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली,
चमत्कार
माऊली देवींची यात्रा बारा वर्षातुन एकदा होत असते व ज्या वर्षी यात्रा असते त्या वर्षी मंदिरात असलेले पाण्याचे कुंड दुधासारखे पांढरे पाणी आल्याने पांढरे शुभ्र होते याला ग्रामस्थ गंगा अवतरली असे म्हणतात व हि घटना फक्त बारा वर्षातून ज्या वर्षी यात्रा असते त्या वेळेसच घडते पण दोन वर्षापुर्वी बारा वर्षे झाली त्यावेळी पण असेच पाणी आले होते
पण कोरोनाचा पार्दुरभाव असल्याने ग्रामस्थांनी दोन वर्षे हि यात्रा पुढे ढकलली होती व या वर्षी हि जत्रा घेण्याचे जाहीर केले होते व तयारी ही सुरू होती पण योगायोग असा की यावर्षी यात्रा होणार असल्याने परत कुंडात पांढरे शुभ्र पाणी येवुन गंगा अवतरली आहे, बारा वर्षातून एकदाच गंगा अवतरते पण योगायोग असा की दोन वेळा गंगा अवतरली याला चमत्कार म्हणायचा की काय म्हणायचे❓
यात्रा मोठ्या प्रमाणात भरते
कणकुंबी, चीगुळे, माऊली मंदिरे व गावे कर्नाटकात आहेत तर कोदाळी माऊली मंदिर व गाव महाराष्ट्रात आहे व तीन्ही माऊली देवी नवसाला पावणार्या म्हणून प्रसिद्ध असल्याने फक्त खानापूर तालुक्यातुनच नाही तर बेळगाव महाराष्ट्रामहाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथुन भाविकांची तुडूंब गर्दी असते,